बंदुकीचा धाक दाखवून मीरा रोड भागात ज्वेलरी शॉप धाडसी दरोडा.
संदीप साळवे प्रतिनिधी
मुंबई / मीरा रोड:- मीरा रोडच्या शांतीनगरमधील एस. कुमार या ज्वेलर्सवर गुरुवारी दुपारी चौघा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घातला. सुमारे दोन कोटींचे दागिने लुटून त्यांनी पोबारा केला.
मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर 4 मध्ये असलेल्या एस. कुमार गोल्ड अँण्ड डायमंडस ज्वेलरी शॉपमध्ये ही घटना घडली. गुरुवारी दुपारी काही तरुण हे ग्राहक बनून ज्वेलरी शॉपमध्ये घुसले होते. दागिने खरेदी करण्याचे नाटक केल्यानंतर त्यांनी बंदुका बाहेर काढल्या आणि सर्व कर्मचाऱ्यांना वेठीस धरले. घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकलवरून दरोडेखोर ग्राहक बनून आले व दुकानात दाखल झाले होते. बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी दागिने, अंगठा, सोने बॅगेत भरून पसार झाले. एका मोटर सायकलवर दोन आरोपी पसार झाले.
तर ज्या मोटारसायकलवर हे चोर आले होते, त्यावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण लोकांची गर्दी झाली होती. लोकांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून घटनास्थळावरच मोटारसायकल सोडून पळ काढला. मोटरसायकल जागेवर सोडून पायी धावत स्टेशनच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्वेलरी शॉपचा पंचनामा केला. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगळे पथक तयार केले आहे. या घटनेची अधिक तपास पोलीस करत आहे. परंतु, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात आणि दुकानदारांमध्ये दहशत पसरली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे मोटरसायकलवरुन आले होते. त्यापैकी दोन जणांनी मोटरबाईकवरुन बॅग आपल्यासोबत ठेवत पळ काढला. तर अन्य दोन जणांनी त्यांच्या टू व्हिलर तेथेच टाकत पायी पळत गेले. गाड्या चोरीच्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर दुकानातील कर्मचाऱ्याने असे म्हटले की, मास्क घालून आलेल्या आरोपीने स्वत:ला ग्राहक असल्याचे भासवून दिले. यापूर्वी 30 डिसेंबरला भोईसर मधील शोरुम मधून 8 कोटी रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना समोर आली होती.