मुंबई तिकिट बुकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याची रेल्वे स्थानकात आत्महत्या.

62

मुंबई तिकिट बुकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याची रेल्वे स्थानकात आत्महत्या.

 प्रियंका पवार प्रतिनिधी

मुंबई:-  50 वर्षीय वृद्ध वरिष्ठ तिकिट बुकिंग सुपरवायझरने गुरुवारी सकाळी आपल्या कॅबिनमध्येच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किशोर कदम असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी आपल्या कॅबिन मध्ये असलेल्या पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यक्तीने केबल वायर पंख्याला बांधून आपले आयुष्य संपवल्याची माहिती दिली गेली आहे.

विद्या विहार पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर कदम हे कल्याण येथील रहिवाशी होते. तर नेहमीच्या वेळेप्रमाणे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजताच्या ड्युटीसाठी आले होते. परंतु थोड्यावेळाने त्यांच्या सहकर्मचाऱ्याने त्यांनी गळफास लावून घेतल्याचे पाहिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

किशोर कदम यांच्याकडे कोणतीही सुसाइट नोट सापडली नाही. तसेच त्यांनी कोणत्या कारणावरुन आत्महत्या केली हे सुद्धा स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस उपायुक्त (झोन VII) प्रशांत कदम यांनी PTI ला असे म्हटले की, प्राथमिक माहितीनुसार अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला गेल आहे. तसेच या प्रकरणी अधिक तपास केला जाईल असे ही स्पष्ट केले आहे.