येत्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज!

65

येत्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज!

काही दिवसांपूर्वी थंडीत गारठलेल्या  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजची सकाळ अचानक झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने झाली आहे. ऐन जानेवारी महिन्यात मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात रिमझिम पाऊस बरसून गेला आहे. काल रात्री पासूनच हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. थंडी कमी झाली आहे.

राज रोकाया प्रतिनिधी

मुंबई:- गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. त्यामुळे आज आणि उद्या 9 जानेवारीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

दरम्यान, गुरुवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.