गोंदिया  हुंड्यासाठी मानसिक छळ दिल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल.

74
टी.बि सातकर प्रतिनिधी

गोंदिया:- जिल्ह्यात सालेकसा व रामनगर या दोन पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी मानसिक छळ दिल्याप्रकरणी दोन पीडित महिलांनी तक्रार दाखल केली आहे. यावरून आरोपीविरूध्द हुंडा प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द येथील विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळीने माहेरून दोन लाख रूपये हुंडा घेवून ये असे बोलून तिला मानसिक व शारीरिक छळ देणे सुरू केले. या जाचाला कंटाळून फिर्यादीने महिलेने सालेकसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून पाच आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरे प्रकरण रामनगर पोलिस ठाण्यातंर्गत फुलचूर येथील आहे. फिर्यादी महिलेचे लग्न सन 2009 मध्ये झाले होते. लग्नापासून फिर्यादीच्या सासरच्या मंडळीने क्षुल्लक कारणाला पुढे करून माहेरून हुंडा घेवून ये असे बोलून तिला शारीरिक व मानसिक छळ देत असत. या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेने रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.