बीबीसीतर्फे २०२१ वर्षातील जगातील १०० प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांची यादी जाहीर, यादीत दोन भारतीय महिलांचा समावेश

72
bbc-most-influential-womans-of-the-year
बीबीसीतर्फे जगातील १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर, दोन भारतीय महिलांचा समावेश

सिद्धांत
२६ डिसेंबर २०२१: दरवर्षीप्रमाणे बीबीसीतर्फे वर्षातील जगातील १०० प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थतीवर मत करून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आण्यासाठी लढणाऱ्या जगभरातील महिलांचा यात समावेश आहे. कला, विज्ञान, समाजसेवा, लेखन यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा यामार्फत गौरव करण्यात आलेला आहे.

जगातील १०० प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांच्या या यादीत दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. मुख्यतः या यादीत अफगाणिस्तानमधील महिलांच्या नावाची निवड करण्यात आलेली आहे.

अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्तेने तेथील महिलांवर अनेक बंधने घातली आहेत. महिलांचा शिक्षणाचा हक्क, काम करण्याचा हक्कांवर बंदी आणली आहे. अश्या परिस्थितीतही आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या अफगाणिस्तानमधील मकदसा अहमजझई, डॉ. आलेमा, फातिमा गैलानी, आमिना करिम्यान, रोया सादत यांसारख्या महिलांचा समावेश आहे.

भारतामधील मुग्धा कालरा आणि मंजुला प्रदीप या दोन महिलांचा बीबीसी १०० प्रभावशाली महिला २०२१ या यादीत समावेश आहे.

मुग्धा कालरा : मुग्धा कालरा तब्बल दोन दशकाहून जास्त काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या फ्लॅक्स या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मच्या चीफ कंटेट स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही काम करतात. त्यांनी ऑटिझमग्रस्तांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नॉट दॅट डिफरंट या संस्थेची स्थापना केली. न्यूरोडायव्हर्सिटीला समजून घेणं आणि सोप्या भाषेत त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हे या संस्थेचे ध्येय आहे. सामान्य लहान मुलांना ऑटिझमबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत व्हावी आणि त्यांनी ऑटिझमग्रस्त मुलांशी मैत्री करावी यासाठी त्यांनी अनोखी कॉमिक स्ट्रीपची संकल्पना समोर आणली.

55404-Mugdha-Kalra
मुग्धा कालरा

मंजुला प्रदीप: गुजरात मध्ये जन्म झालेल्या मंजुळा प्रदीप गेली ३० वर्षे महिलांच्या अधिकारासाठी, देत त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देत आहेत. समाजातील उपेक्षित लोकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या वकील म्हणून त्या प्रसिद्ध आहे. द नॅशनल काऊन्सिल ऑफ विमेन लीडर्स या संस्थेची त्यांनी स्थापना केली. नवसर्जन ट्रस्ट या दलित हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. इंटरनॅशनल दलित सॉलिडॅरिटी नेटवर्कच्या त्या सक्रिय सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्णद्वेष विरोधी कॉन्फरन्समध्ये त्यांनी भारतातील दलित हक्कांबद्दलची मतं मांडलेली निर्भीडपणे मांडली आहेत.

manjula-pradip
मंजुला प्रदीप