indian-army-soldiers-sucide
भारतीय सैन्यातील ७८७ जवानांनी केली आत्महत्या
indian-army-soldiers-suicide
भारतीय सैन्यातील ७८७ जवानांनी केली आत्महत्या

सिद्धांत
२७ डिसेंबर २०२१: “ये नया इंडिया है, ये घर मे घुसेगा भी, और मारेगा भी” या उरी चित्रपटातील सवांदावर आपण सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या असतील. बॉर्डर सिनेमा आजही भारतातील घराघरात आवडीने पहिला जातो. आर्मी हा भारतीयांसाठी अंत्यत जवळचा आणि चर्चेचा विषय आहे. जवळपास १४ लाख मनुष्यबळ असलेले भारतीय लष्कर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे लष्कर आहे. संरक्षण बजेटवर खर्च करण्यात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर येतो. उत्तेरकडील उत्तुंग हिमालयांमधील सीमारेषांवर, तर राजस्थानमधील वैराण वाळवंटामध्ये, उत्तर-पूर्वेकडील घनदाट जंगलातील सीमांवर भारतीय सैनिक जीवाची बाजी लावून भारतीय जनतेचे रक्षणासाठी सदैव उभे असतात.

आर्मीमध्ये भरती होणे हे बऱ्याच भारतीय कुटुंबामध्ये एक अभिमानास्पद परंपरा असते. वडीलधाऱ्या व्यक्तीच्या मागोमाग अनेक तरुण आर्मीमध्ये भरती होतात. कोल्हापूरमधील सैनिकांच्या गावाबद्दल तर आपल्याला माहिती असेलच. आर्मीमध्ये भरती होणाऱ्या जवानांची संख्या भारतातील वेगवेगळ्या राज्यात,प्रांतामध्ये कमी-अधिक दिसून येते. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

आर्मीमध्ये सर्वात जास्त जवानांची भरती होणारी राज्ये
(प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमधून)

२०१७ ते २०१९ या वर्षांमध्ये हिमाचल प्रदेश राज्यातून सर्वात जास्त म्हणजे ४०२ जवान तर गोवा राज्यातून सर्वात कमी म्हणजे केवळ ४ जवान भारतीय आर्मीमध्ये भरती झाले. प्रामुख्याने सीमारेषेजवळील राज्यांमधून जवान मोठ्या संख्येने आर्मीमध्ये भरती होतात. या कालावधीत जम्मू-काश्मीर मधून १८५, पंजाब मधून १७४,हरियाणा मधून १२२, उत्तरखंडमधून २७१, अरुणाचल प्रदेश १२७, मिझोराम राज्यातून १३९ जवान भारतीय आर्मीमध्ये भरती झाले.

याउलट गोवा राज्यातून सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमागे ४ जवान भारतीय आर्मीमध्ये भरती झाले. त्यामागोमाग सर्वात कमी सैन्यभरती होणाऱ्या राज्यांच्या यादीत ओडिसा १४, गुजरात 16, तेलंगणा १७, त्रिपुरा १८ या राज्यांचा समावेश होतो.

गुजरात आणि महाराष्ट्रातून भरती होणाऱ्या जवानांची संख्या.
जवळपास साडे अकरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्र राज्यातून २०१७ ते २०१९ या कालावधीतून प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमागे ३३ जवान भारतीय सैन्यात भरती झाले, तर गुजरात राज्यात या दरम्यान १६ जवान भारतीय सैन्यात भरती झाले. गुजरात राज्यामधून सैन्यात भरती होणाऱ्या जवानांची संख्या इतर राज्याच्या तुलनेत कमी असल्याचे भारतीय सैन्याद्वारे जाहीर झालेल्या आकडेवारीमध्ये दिसून आलं होत. २०१५ ते २०१८ या कालावधीत गुजरात ,दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या विभागातून ३१९९ जवान सैन्यात भरती झाले . तर या कालावधीत उत्तरप्रदेशमधून भरती होणाऱ्या जवानांची संख्या २२,७१२, उत्तराखंड मधून १०,३१४ , पंजाब मधून १४,६५७ इतकी होती.

आजच्या घडीला महाराष्ट्र राज्यातील ८७,८३५ जवान भारतीय सैन्यामध्ये आपली सेवा देत असून उत्तर प्रदेश, पंजाबनंतर महाराष्ट्र या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते.

Indian-army-soldiers-suicide
आर्मीमध्ये सर्वात जास्त जवानांची भरती होणारी राज्ये (प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमधून)

भारतीय सैन्यातील ७८७ जवानांनी केली आत्महत्या
सैन्यामधील नोकरी करताना जवानांना आपल्या प्राणाची पर्वा न करता प्रतिकूल परिस्थितीमध्ये सीमांचे, भारतीय जनतेचे संरक्षण करण्याचे काम पार पडायचे असते. त्याचवेळी आपल्या कुटुंबाची जबाबदारीसुद्धा त्यांच्या खांद्यावर असते. यातुन उद्भवणाऱ्या ताणतणावाचा कधीकधी मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मार्च २०२१ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतीय आर्मीतील ५६१, नौदलातील ३६ तर हवाई दलातील १६० जवानांनी आत्महत्या केल्याची चिंताजनक माहिती समोर आली होती. तसेच २००५ ते २०१७ या कालावधीत भारताने सीमारेषेवरील चकमकीत, दहशतवादी विरोधी कारवायांमध्ये आपल्या १६८४ शूर सैनिकांना गमावले होते.

जवानांचे मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहावे म्हणून सैन्याने ” मिशन जिंदगी” हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून, या अंतर्गत सैनिकी तळांवर मानसिक आरोग्य व्यवस्थापन संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here