
सिद्धांत
७ जानेवारी २०२१: भारतीय मार्केटमध्ये जगभरातल्या कंपन्यांच्या स्मार्टफोनची वर्षभर रेलचेल असते. लोकांच्या आवडीचे फीचर्स असलेले, त्यांच्या पसंतीस उतरणाऱ्या लुकमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आपले स्मार्टफोन्स रिलीझ करत असतात. सध्याच्या “वर्क फ्रॉम होम” आणि “एजुकेशन फ्रॉम होम” च्या काळात चांगले परफॉर्मन्स देणारा स्मार्टफोन नोकरदार तसेच विद्यार्थ्यांच्या हाताशी असणे अत्यावश्यक झाले आहेत. उत्तम कॅमेरा, दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि अद्यावत प्रोसेसर ह्यासारखे फीचर्स मोबाईल खरेदी करताना अगदी महत्त्वाचे असतात आणि त्यावरून त्यांची किमंत ठरलेली असते. पण काळजी करू नका, फक्त १५ हजारापर्यंत ५० MP कॅमेरा आणि ५००० mAh इतक्या दीर्घ काळ चालणारी बॅटरी असणारे स्मार्टफोन देखील मार्केट उपलब्ध आहेत. चला तर त्याची माहिती घेऊ.
Realme Narzo 50A:ह्या मोबाईलमध्ये ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा असून आठ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये मिळणारी ६००० mAh बॅटरी हि १८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. नवनवीन गेम्स, ग्राफिक्स, ऍपस उत्तम रीतीने चालण्यासाठी मोबाईलमध्ये MediaTek Helio G85 हा प्रोसेसर देण्यात आलेला असून फ्लिपकार्टवर या मोबाईलची किमंत ११,४९९ इतकी आहे.

Realme 8i: ४ जिबी रॅम असलेल्या या मोबाईलची स्क्रीन ६.६ इंच इतकी आहे. ह्या मोबाईलमधील मुख्य कॅमेरा ५० MP असून सेल्फी कॅमेरा हा १६ MP इतका असल्याने फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी हा मोबाइल अगदी उत्तम निवड असेल. 5000 mAh बॅटरी सोबत ह्या स्मार्टफोनमध्ये Helio G96 हा प्रोसेसर देण्यात आले आहे. फ्लिपकार्टवर मोबाईलची किमंत १३,९९९ इतकी आहे.

Redmi 10 Prime: हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर तुम्ही फक्त १३,२०० रुपयात खरेदी करू शकता. ४ जिबी रॅम आणि ६४ जिबी रॉम असलेल्या या मोबाईलची मेमरी तुम्ही ५१२ जिबी पर्यंत वाढवू शकता. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६००० mAh बॅटरी लाइफसह Helio G८८ प्रोसेसर दिला जातो. कॅमेऱ्याच्या दृष्टीने सुद्धा हा स्मार्टफोन उत्तम असून ५० MP मुख्य कॅमेरा आणि ८ MP सेल्फी कॅमेरा यात दिला गेला आहे. तसेच स्मार्टफोनला ६.५ इंचाची फुल एचडी स्क्रिन आहे.

Infinix Note 11: ६.७ इंचाची मोठी स्क्रीन आणि ५००० mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर जवळपास १२,५०० रुपयांपर्यंत मिळतो. ह्या फोनमध्ये ५० MP मुख्य कॅमेरा असून १६ MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आलं आहे. फोनमध्ये ४ जिबी रॅम आणि ६४ जिबी रॉम असून त्याची क्षमता तुम्ही ५१२ जिबी पर्यंत वाढवू शकता. आकर्षक डिझाईन असलेला हा स्मार्टफोन ग्राहकांना हिरव्या, करड्या, काळया रंगांपैकी आपल्या आवडीच्या रंगामध्ये खरेदी करता येतो.

SAMSUNG Galaxy F12: ४ जिबी रॅम आणि ६४ जीबी रॉम असलेल्या सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाची स्क्रिन देण्यात आलेली आहे. ४८ MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह ८ MP चा सेल्फी कॅमेरा मोबाईलमध्ये आहे. तसेच ६००० इतका दीर्घ काळ चालणारी बॅटरी स्मार्टफोनमध्ये असून Exynos ८५० प्रोसेसरचा मोबाइलला सपोर्ट आहे. हा मोबाइल फ्लिपकार्टवर ११,४९९ रुपयात उपलब्ध आहे.

मग तुम्ही कोणता स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय?