युग इलेक्ट्रिक वाहनांचे, भारतातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या

59
युग इलेक्ट्रिक वाहनांचे, भारतातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या

मीडिया वार्ता न्युज
८ फेब्रुवारी, मुंबई: चाकाचा शोध लागल्यापासून ते इंधन तेलांवर वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या गाड्या पर्यंत, वाहनांनी मानवी जीवनाच्या प्रगतीला वेग दिला आहे. परंतु इंधन तेलांचा मर्यादित साठा आणि त्यांचा वापर केल्याने होणारे प्रदूषण याबद्दल जगभरातील देशांनी गंभीर विचार सुरुवात केली आहे.

युरोपमधील बहुतेक देशांनी २०३० पर्यंत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या निर्मितीला पूर्णपणे बंदी घालण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. भारत सरकारने फेम योजनेअतंर्गत देशभरातील विविध शहरांतील सार्वजनिक वाहतुकीसाठी ६३१५ इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत. तसेच देशभरांमध्ये २८७७ चार्जिंग स्टेशन उभारलेले जाणार आहेत. नागरिकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता पाहता भारतातल्या अनेक दुचाकी कंपन्यांनी भारतीय ग्राहकांच्या आवडी – निवडीनुसार विविध फीचर्ससह दुचाकी गाड्या बाजारात आणल्या आहेत. खिशाला परवडणाऱ्या आणि पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्यास हातभार लावणाऱ्या अशा कोणत्या गाड्या भारतात उपलब्ध आहेत, चला पाहूया.

OLA S1 -OLA S1 PRO:

ओला एस १ आणि ओला एस १ प्रो या दोन इलेक्ट्रिक स्कुटरची किमंत ८५ हजार ते १ लाखाच्या घरात आहे. या दोन्ही स्कुटरची रेंज अनुक्रमाने १२१ आणि १८१ किलोमीटर असून यांचा कमाल वेग ९० ते ११५ किमी इतका आहे.

 

Ather 450X:

ऍथर ४५० एक्स ह्या किंमत १.१३ लाख इतकी असून या दुचाकीमध्ये ग्राहकांना ४ जी सिम कार्ड आणि ब्लूटूथची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ह्या स्कुटरचा कमाल वेग ताशी ८० किमी असून रेंज ११६ किमी इतका आहे.

Bajaj Chetak Electric:

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कुटर तुलनेने थोडी महाग, म्हणजे जवळपास १.४० लाखामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ह्या स्कुटरचा कमाल वेग ७० किमी असून इलेक्ट्रिक बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच तासाचा अवधी लागतो. बजाज चेतकच्या आयकॉनिक डिझाईनमुळे हि बाईक सध्या चर्चेमध्ये आहे.

हे आपण वाचलंत का?
कर्जतच्या सोनगिरी किल्यावर फडकला भगवा ध्वज, वेध सह्याद्री संस्थेचे शिवकालीन किल्ले संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य.
भारतात आणले जाणार आफ्रिकन चित्ते.
कोट्यावधी जनतेची मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर, जयंती विशेष लेख.

TVS iQube:

जवळपास ८० किमी कमाल ताशी वेग असलेल्या या स्कुटरची रेंज ८३ किमी आहे. ह्या स्कुटरच्या बॅटरी चार्जिंगसाठी ६ तासांचा अवधी लागतो. टीव्हीएस मार्फत हि स्कुटर १ लाख १५ रुपयांना विकली जाते.

Hero Electric Optima LA:


हिरो इलेक्ट्रिक ऑप्टीमा हि भारतातील सर्वात स्वस्त दुचाकींपैकी एक आहे. ह्या दुचाकींचा कमाल वेग ताशी ५० किमी इतका आहे तर देशभरात हि स्कुटर ग्राहकांसाठी ४५ हजार रुपयात उपलब्ध आहे.