बोटांना पेन चिटकवून रेखाटले लता मंगेशकरांचे सुरेख चित्र, नक्की पहा

61

कलाकार कितीही मोठा किंवा छोटा असो आणि तो कोणत्याही क्षेत्रातला असो. कलाकार आपल्या कलेतून एकमेंकाना नवनवीन  देत असतात

बोटांना पेन चिटकवून रेखाटले लतादीदींचे सुरेख चित्र, नक्की पहा

सिद्धांत
९ फेब्रुवारी, मुंबई: स्वर्गीय स्वर लाभलेल्या गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर कलाकार, रसिकांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. तब्बल ३६ भाषांमधील ३० हजारांहून जास्त गाणी गायलेल्या लता मंगेशकरांनी भारताला विविध राज्यातील, विविध भाषा बोलणाऱ्या लोकांच्या ह्रदयात संगीताच्या माध्यमातून एक खास स्थान निर्माण केले होते.अशा रसिकांनी सोशल मीडियावर लतादीदींचे फोटो शेअर करत त्त्यांच्याबद्दलच्या आठवणी मांडल्या, तर काहींनी त्यांच्या अजरामर गाण्यांबद्दल बोलून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आपण हे वाचलंत का?

  • लतादीदींचा जीवनप्रवास पाहूया त्यांच्या काही दुर्मिळ छायाचित्रांमधून

या दरम्यान विविध चित्रकारांनीसुद्धा लता मंगेशकरांची सुंदर चित्रे रेखाटली. त्यापैकी संजू आर्टस् नावाच्या चित्रकाराने लता मंगेशकरांचे काढलेले चित्र साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. खासकरून हे चित्र काढण्यासाठी चित्रकाराने वापरलेली पद्धत फारच उल्लेखनीय आहे. चित्र काढण्यासाठी चित्रकाराने बोटांना काळ्या, निळ्या आणि लाल शाहीची पेन चिकटवून एकाच वेळी त्यांचा सफाईदार वापर करत लता मंगेशकरांचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे.

कलाकार कितीही मोठा किंवा छोटा असो आणि तो कोणत्याही क्षेत्रातला असो. कलाकार आपल्या कलेतून एकमेंकाना नवनवीन कलाप्रकार विकसित करण्याची प्रेरणा देत असतात. यांमुळे रसिकांना मन मोहून टाकणाऱ्या कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते.