संजय राऊतांची शिवसेना भवनावरची पत्रकार परिषद, महाराष्ट्रातील कोणत्या साडेतीन मंत्र्यांना होणार आता अटक? नक्की काय म्हणाले संजय राऊत.

63

सिद्धांत
१५ फेब्रुवारी, मुंबई:

काय  म्हणाले संजय राऊत?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी सांगितले तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव करून देण्यासाठी हि पत्रकार परिषद  घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • ईडीकडून भल्या पहाटे महाराष्ट्रातील माझ्या, काँग्रेस आणि पवार साहेबांच्या घरांवर रेड. हे केवळ महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून चालेले षडयंत्र
  • किरीट सोमय्यांवर जहाल टीका.
    ठाकरे कुटुंबीयावरील आरोप खोटे. अलिबागमध्ये ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले असल्याचा आरोप खोटा. किरीट सोमय्या यांनी मुंबईत मराठी शिकवू नये, म्हणू केली होती याचिका दाखल. लोकांची दिशाभूल करण्याचे भाजपचे कारस्थान.
  • अलिबागमधील सामान्य नागरिकांना ईडीच्या धमक्या. पहाटे घरातून उचलून तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकी.
    माझ्यावर जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप खोटे.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा देवेंद्र फडणवीसांच्या काळात. महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा. भाजप सत्तेत असताना हरयाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का?
  • पीएमसी घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्याशी किरीट सोमय्या यांच्या मुलाची व्यवसायात पार्टनरशिप. राकेश वाधवान याने भाजपला दिले २० कोटी. निल सोमय्या आणि राकेश वाधवान यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे इडीकडे मी तीनदा पाठवले. ईडी दुर्लक्ष का करतेय?
  • जितेंद्र नवलानी, फिरोझ शमा यांच्या हस्ते मुंबईतील ७० बिल्डरकडून केली गेली आहे ३०० कोटींपेक्षा जास्त रक्कमेची वसुली. ह्या घोटाळ्याचे विडिओ आणि डॉक्युमेंट माध्यमांना दिले जातील.
  • पत्रा चाळीची जमीन मोहित कंबोज यांनी घोटाळा करून घेतली विकत. हे मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी. या सर्व घोटाळ्यांसाठी पीएमसी बँकेतील लोकांचा बुडवलेला पैसा वापरला गेला.

हे आपण वाचलंत का?

ते साडे-तीन नेते कोण?
या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, उद्यापासून अटक व्हायला सुरुवात झाल्यावर तुम्हाला सगळ्यांना कळेल, विविध घोटाळ्यात अडकणारे ते साडे -तीन नेते कोण?