राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे व कासवगतीने सुरू.
✍ विनोद कोडापे✍
8380802959
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
मीडिया वार्ता
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येत असलेल्या धानोरा- मुरुंगाव या रस्ता दुरस्तीचे काम मागील वर्षांपासून सुरू आहे. मात्र या रस्ता दुरस्ती काम निकृष्ट दर्जाचे व कासवगतीने सुरू आहे. या दूरस्ती कामातील संतपणा व वाहनधारकासह प्रवाशांसाठी तापदाई ठरत आहे. त्यामूळे या राष्ट्रीय महामार्गाचे केव्हा पूर्ण होणार असा रोषदायक प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
धानोरा तालुका मुख्याल्यापासून धानोरा- मुरूंगाव- छत्तीसगड मार्ग राष्ट्रीय महामार्गात मोडतो या मार्गावरून दैनिदिन अवजड वाहनासह इतर वाहनाचे छत्तिसगड, मध्यप्रदेश राज्यात आवागमन सुरू असते तसेच शासकीय कर्मचारीच्या तालुका परिसरातील नागरिकांचीही नेहमीच या मार्गावरून वर्दळ सुरू असते वर्षभरातून राष्ट्रीय महामार्ग विभागांअतर्गत धानोरा- मुरुमगावं या 22 की.मी मार्गाच्या दुरस्थीचे काम हाती घेण्यात आले. मात्र सदर काम अतिशय संत गतीने व निकृष्ट दर्जाचे रोड चे काम सुरू आहे. यामुळे प्रवाशांना कमालीची त्रास सहन करावा लागत आहे. हत्ती गोटा ते मुरूंमगाव या मार्गावरून वाहन चालविताना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मार्गावर ठीक ठिकाणी गिट्टी पसरलेली गेली असून अनेक दुचाकी वाहन चालकांचे वाहने घसरून किरकोळ अपघातही घडले आहेत. तसेच या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण पणे निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. शासनाने दिलेल्या इस्टूमेट नुसार रस्त्याचे काम सुरू नाही. व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तरी या राष्ट्रीय महामार्गा विभागाने तात्काळ पाहणी करून व सकोल चौकशी करून रस्त्याची दुरस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.