कुशीनगरमध्ये लग्न समारंभाच्या वेळी विहिरीत पडून १३ महिलांचा मृत्यू
कुशीनगरमध्ये लग्न समारंभाच्या वेळी विहिरीत पडून १३ महिलांचा मृत्यू

सिद्धांत
१७ फेब्रुवारी, मुंबई: उत्तरप्रदेश मधील कुशीनगर जिह्यातील गावामध्ये लग्न समारंभाच्या वेळी १३ महिलांचा घरातील विहिरीत पडून दुर्दवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १० लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार काल रात्री ८:३० च्या सुमारास गावामध्ये लग्न समारंभादरम्यान हळदीचा कार्यक्रम चालू होता. त्यावेळी विहिरीवर बांधलेला स्लॅब तुटल्याने त्यावर बसलेल्या महिला आणि मुली विहिरीत कोसळल्या. अरुंद विहिरीमुले बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते. या दुर्घटनेत १३ महिलांचा मृत्यू झाला, तर १० जणांना दुखापत झाली आहे.

 

https://youtu.be/UYkl3S7kzDw

 

जिल्हा प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख मदतनिधी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here