helpline

विद्यार्थ्यांनी शहर जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

helpline

मीडिया वार्ता न्युज
२५ फेब्रुवारी, मुंबई:  रशिया- युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून मुंबई शहर जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

देशातून युक्रेनमध्ये गेलेले अनेक नागरिकविद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून, या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे  हेल्पलाईन कार्यान्वित केल्या आहेत.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयनवी दिल्ली

● टोल फ्री क्रमांक – 1800118797

● दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905

● फॅक्स क्र. 011-23088124

● ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क

साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहरच्या  022- 22664232 या दूरध्वनी क्रमांकावर आणि mumbaicitync@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/CaZFBluNIqs/

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील घडलेल्या घटनांचा वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर फॉलो करा.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here