कृषी वीज ग्राहकांना दिली महाराष्ट्र शासनाने सूट !!!
महाराष्ट्र शासनाचा वीज ग्राहकांना आवाहन !!
महाराष्ट्र शासनाचा आदेशाने भंडारा जिल्ह्यातील कृषी वीज ग्राहकांना दिले नोटीस !
✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
मोहाडी :- महाराष्ट्र शासनाने कृषी ग्राहकांसाठी कृषी धोरण २०२० जाहीर केलेले असून त्या अंतर्गत कृषीपंप, विज बीलामध्ये मोठया प्रमाणात सूट दिली आहे. सदर योजनेचे फायदा घेण्यासाठी तसेच आपल्याला लागू असलेली
सवलतीबाबतची माहिती जाणून घेण्याकरिता नजीकच्या वीज वितरण कार्यालयास संपर्क साधावा व सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच विजेचे थकीत असलेले बिल भरुन महावितरण कंपनीस सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
सर्व कृषी विज ग्राहकांना अशी सूचना दिली आहे की भंडारा जिल्हा अंतर्गत काही शेतकरी त्यांच्या विद्युत जोडणी, विज वाहनीचा अनिधिकृतपने आकोडा टाकून भूमिगत तारांचा माध्यमाने वन्य प्राण्यांच्या अवैध्य शिकार करीत आहेत, सदर बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून हा कायदेशीर गुन्हा आहे.
त्यामुळे आपल्याला या नोटीस द्वारे सूचित करण्यात येते की आपल्याला वीज महावितरण कंपनी कडून देण्यात आलेल्या विज जोडनीच्या कुठल्याही स्वरूपाचे अवैध वायर, आकोडे , टाकून त्याचा गैरवापर, अनधिकृत वापर करू नये. सदर प्रकार घडल्यास व आढळल्यास आपणावर भारतीय विद्युत अधिनियम २००३ कलम १३५/१३८/१२६/ अन्वये गंभीर दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे नोटीस देऊन बजावले.
व विज ग्राहकांना आपल्या हातातून कोणतीही चुका करू नये अशी नोटीस द्वारे ताकीद करण्यात आले.