राज्यपालांनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – 9768545422
बदलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोणी विचारले असते ? असे वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर चहुबाजूंनी टीकेचा भाडीमार होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधत शिवरायांचा अपमाण केल्याप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान करून आमच्या स्वाभिमानाला सतत आव्हान देत आहेत. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. मोदीजी, तु्म्ही महाराष्ट्रात आल्यावर या धाडसीपणाबद्दल जनतेला उत्तर द्यावे लागेल, अशी टीका पटोले यांनी केली.
राज्यपालांनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे
राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही त्यांचे गुरू नव्हते. हा खरा इतिहास आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी औरंगाबादेत सांगितलेला इतिहास खोटा आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. यामुळे सदर वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्वरित मागे घ्यावे, असे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
हे आपण वाचलंत का?
https://www.instagram.com/p/CaJsFigKgO2/
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.