रहस्य कैलास पर्वताचे…कोण आहे कैलास पर्वत ओलांडणारा इतिहासातील एकमेव व्यक्ती?

93

जगातील गूढ आणि रहस्यमयी ठिकाणांपैकी एक असलेल्या या कैलास पर्वतावर आजवर सर्वसामान्याना अचंबित करणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आहेत.

रहस्य कैलास पर्वताचे…कोण आहे कैलास पर्वत ओलांडणारा इतिहासातील एकमेव व्यक्ती?

मनोज कांबळे
१ मार्च, मुंबई: भारत आणि तिबेट देशांदरम्यान पसरलेल्या कैलास पर्वत रांगांमधील कैलास पर्वत शिखरावर हिंदू देवता शंकर आणि पार्वतीचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. जैन धर्माबरोबरच तिबेटियन बुद्धिस्ट इतिहासामध्ये मेरू या नावाने ओळखल्या या जाणाऱ्या कैलास पर्वताला खास धार्मिक महत्त्व आहे. जगातील गूढ आणि रहस्यमयी ठिकाणांपैकी एक असलेल्या या कैलास पर्वतावर आजवर सर्वसामान्याना अचंबित करणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आहेत. इतिहासामध्ये आजवर केवळ एकाच व्यक्तीला कैलाश पर्वतावर यशस्वी चढाई करण्यात यश मिळाले होते. कोण होती ती व्यक्ती ? आणि काय आहेत कैलास पर्वताची अनेक गूढ रहस्ये ? चला वाचूया?

भारत, तिबेट चीन देशांमधील विविध धर्मातील लोक कैलास पर्वत आणि मानसरोवर या पवित्र ठिकाणांची परिक्रमा करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून येत असतात. यादरम्यान भाविकांना येणार सर्वात लक्षणीय अनुभव म्हणजे त्यांच्या केसांचा आणि नखांच्या वाढण्याचा वेग. आकड्यामध्ये सांगायचे झाल्यास बाहेरच्या जगात २ आठवड्यामध्ये जितकी नखांची आणि केसांची वाढ होते, तितकी वाढ कैलास पर्वतच्या परिसरात केवळ १२ तासात होते, असे मानले जाते.

कैलास पर्वताचा आकार हा शास्त्रज्ञाच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. जवळपास ६६०० मीटर उंचीचा पर्वत आणि त्याच्या चारही बाजूनं असलेल्या सरळ बाजूमुळे अनेक लोंकानी कैलास पर्वत एक पिरॅमिडचा प्रकार असल्याचा प्रस्ताव मांडले होते.

आधुनिक गिर्यारोहणाच्या सुरुवातीच्या काळादरम्यान १९२६ साली रूटलएड्ज यांच्या नेतृत्त्वाखाली कैलास पर्वत पादाक्रांत करण्याची योजना आखण्यात आली होती. कैलास पर्वतच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी प्राथमिक मार्गांची आखणी करण्यात आली. पण चढाई करता क्षणीच बर्फाचा कडा कोसळल्याने समोरचे मार्ग बंद झाले आणि मोहीम अयशस्वी ठरली. त्यानंतर भविष्यात कैलास पर्वतावरील अनेक योजना असफल ठरल्या. प्रयत्न करणाऱ्या गिर्यारोहकांच्या जीवावर बेतणाऱ्या अपघातांना सामोरे जावे लागले होते.

कैलास पर्वत पार करणारा इतिहासातील एकमेव व्यक्ती?
१२ व्या शतकामध्ये मिलारेपा नावाच्या तिबेटियन बुद्ध भिक्कूने कैलास पर्वतावर यशस्वी चढाई केल्याची नोंद तिबेटियन बुद्धिस्ट इतिहासामध्ये सापडते. बुद्ध भिक्कू बनण्याच्या आधी गुन्हेगार असलेल्या मिलारेपाने आपल्या चुकांची जाणीव होऊन बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. तिबेटमध्ये बौद्ध भिक्कू मिलारेपा यांना फार मानाचे स्थान आहे.

भारत, तिबेट आणि चीन मधील विविध धर्मिंयाच्या मनातील कैलास पर्वतचे स्थान विचारात घेता चीन प्रशासनाने कैलास पर्वतावर गिर्यारोहण करण्यास कायमची बंदी घेतली आहे. कैलास पर्वताला पादाक्रांत करणे म्हणजे, लोकांच्या आत्म्याला पादाक्रांत करणे. गिर्यारोहकांनी कैलास पर्वताऐवजी दुसऱ्या पर्वतांवर गिर्यारोहण करावे, असे चीन प्रशासनाने आवाहन केले होते.