भारताचा पेरू जगात बेस्ट, पेरूच्या निर्यातीत विक्रमी वाढ

पेरूच्या निर्यातीत २०१३ पासून आतापर्यंत २६०% नी वाढ

भारताचा पेरू जगात बेस्ट, पेरूच्या निर्यातीत विक्रमी वाढ

मीडिया वार्ता
६ मार्च, मुंबई: भारतातून होणाऱ्या पेरूच्या निर्यातीत 2013 पासून 260% वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते जानेवारी 2013-14 मध्ये 0.58 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीचे पेरू निर्यात करण्यात आले तर एप्रिल ते जानेवारी 2021-22 मध्ये 2.09 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याचे पेरू निर्यात करण्यात आले.

भारतातून होणाऱ्या ताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. संपूर्ण ताज्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीत द्राक्षांची सर्वात जास्त निर्यात झाली आहे. वर्ष 2020-21 मध्ये, 314 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या ताज्या द्राक्षांची निर्यात करण्यात आली. 302 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची इतर ताजी फळे, 36 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे आंबे, 19 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची सुपारीची पाने आणि फळे निर्यात करण्यात आली. भारताच्या ताज्या फळांच्या एकूण निर्यातीत ताजी द्राक्षे आणि इतर ताज्या फळांचा वाटा 92% आहे.

 

हे आपण वाचलंत का?

 

भारतातून 2020-21 मध्ये निर्यात करण्यात आलेली ताजी फळे मुख्यतः बांगलादेश (126.6 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), नेदरलँड्स (117.56 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), संयुक्त अरब अमिरात(100.68 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), युके (44.37 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) सौदी अरेबिया (24.79 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), ओमान (22.31 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) आणि कतार (16.58 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) या देशांना पाठविण्यात आली. 2020-21 मध्ये निर्यात करण्यात आलेल्या ताज्या फळांपैकी 82% फळे प्रमुख 10 देशांना निर्यात करण्यात आली.

https://www.instagram.com/p/CaUf3bxK98d/

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या घटनांचा वृत्तांत पाहण्यासाठी मीडियावार्ताला आजच INSTAGRAM वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here