डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नारी शक्तीवरील विश्वास

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसंगी आपल्या राजकीय कारकिर्दीची तमा न बाळगता भारतीय समाजातील सर्व घटकांमधील स्त्रियांच्या हक्कांसाठी, संरक्षणासाठी लढा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नारी शक्तीवरील विश्वास

सिद्धांत
८ मार्च, मुंबई: स्त्री-शिक्षण आणि स्त्री-सशक्तीकरणाच्या कार्याला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन रूढीवादी समाजाच्या प्रखर विरोधाला न जुमानता सुरुवात केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच वारसा नेटाने पुढे चालवला. प्रसंगी आपल्या राजकीय कारकिर्दीची तमा न बाळगता भारतीय समाजातील सर्व घटकांमधील स्त्रियांच्या हक्कांसाठी, संरक्षणासाठी त्यांनी लढा दिला. नारीशक्ती वर त्यांचा ठाम विश्वास होता, आणि समाजाची प्रगतीमध्ये स्त्रियांचा सर्वात मोठा वाटा असतो, असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून, लेखनांतून अनेकदा दिला होता.

काय होते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिला सशक्तीकरणाबद्दल मांडलेले विचार ?

– कोणत्याही समाजाची प्रगती हि त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते, असे मला वाटते.

– महिलांच्या सहभागाशिवाय झालेली एकता व्यर्थ असते. महिला शिक्षित होत नसल्यास शिक्षणाच्या योजना अर्थहीन आहेत आणि महिलांच्या ताकदीशिवाय उभे राहिलेलं आंदोलन हे अपूर्ण असते.

– महिलांनी उभ्या केलेल्या चळवळींवर माझा खूप विश्वास आहे. जर त्यांच्यावर विश्वास ठेवून महिलांना नेतृत्व करायची संधी दिल्यास तर त्या सामाजिक समस्या सोडवून समाजाचा कायापालट करण्यात यशस्वी होतील. भूतकाळात समाजातील मागासलेल्या लोकांच्या उन्नतीसाठी स्त्रियांनी भरीव काम केले आहे.

हे आपण वाचलंत का?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here