गडचिरोलीत पार पडला ११९ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा,पाच हजार पाहुण्यांची हजेरी.

गडचिरोलीत पार पडला ११९ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा,पाच हजार पाहुण्यांची हजेरी.

गडचिरोलीत पार पडला ११९ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा,पाच हजार पाहुण्यांची हजेरी.

✍ विनोद कोडापे✍
जिल्हा परिषद गडचिरोली
📱8380802959📱

पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी व मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी युवक-युवती व आत्मसमर्पीत नक्षल जोडप्यांसाठी भव्य सामुहिक विवाह सोहळा शहरातील चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे सकाळी १० वाजता संपन्न झाला.यात १६ आत्मसमर्पीत नक्षल जोेडपे व १०३ सर्वसाधारण जोडपे असे एकूण११९ आदिवासी युवक-युवती विवाह बंधनात अडकले.
विवाह सोहळ्याला पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि गंगाधर ढगे ,आमदार डॉ देवराव होळी,आमदार कृष्णा गजभे, प्रचीत पोरद्दीवर,मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा. संजय भेंडे, सचिव मा.प्रा. प्रमोद पेंडके, मैत्री परिवार संस्था मार्गदर्शक गडचिरोली मा. डॉ. शिवनाथ कुंभारे, पुणे मैत्री परिवार संस्था मार्गदर्शक मा. श्री बाळासाहेब अरगडे (पाटील), मैत्री संस्था मार्गदर्शक मा.श्री सुनिल चिलेकर, व इतर मान्यवर उपस्थित होते.