या उपक्रमात भाग घेण्यासाठी तुमच्या गावातील, विभागातील बुद्ध विहारात होणाऱ्या उपक्रमाचे फोटो 9920853847 या व्हाट्सअॅप क्रमांकावर पाठवू शकता.
विशाल गांगुर्डे
बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं :- ९७६८५४५४२२
बदलापूर : महाराष्ट्रातील अनेक बुद्धविहारे बौद्ध धम्माच्या जोपासनेबरोबरच समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक प्रगतीचे केंद्रे बनली आहेत. बुद्ध विहारात धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्याने समाजात विहाराचे अढळ स्थान निर्माण झाले आहे. राज्यातील अशा बुद्ध विहारांना शोधून त्यांचा गौरव करण्याचा उपक्रम ‘मीडिया वार्ता न्यूज’ने हाती घेतला आहे.
बौद्ध धम्माच्या प्रचाराबरोबर समाजाच्या उन्नतीसाठी बुद्ध विहारांचा मोठा वाटा असतो. महाराष्ट्रातील अनेक भागात बुद्ध विहारे चळवळीची केंद्रे बनली आहेत. अशा विहाराचा गौरव करण्याचा मानस ‘मीडिया वार्ता न्यूज’चा आहे. यासाठी ‘शोध आदर्श बुद्ध विहारांचा’ असा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमात भाग घेण्यासाठी तुमच्या गावातील, विभागातील बुद्ध विहारात होणाऱ्या उपक्रमाचे फोटो 9920853847 या व्हाट्सअॅप क्रमांकावर पाठवू शकता. मीडिया वार्ताच्या या उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्वोत्तम तीन बुद्ध विहारांना ‘नॉलेज सेंटर’चे खास पारितोषिक देण्यात येईल. मीडिया वार्ताच्या टीमने या उपक्रमाचे छापील परिपत्रक देखील महाडच्या चवदार तळ्याजवळील भागात अनुयायांना वाटले. ते छापील परिपत्रक वाचून अनेकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
हे आपण वाचलंत का ?
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
- मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वापरला जाणार “इस्रायल पॅटर्न
- दलित समाजाला माणूसपण मिळवून देणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाला ९५ वर्षे पूर्ण, लाखो नागरिकांनी केले अभिवादन