बीरभूम जळीतकांड: सहा महिलांसह दोन मुलांची घरासह जाळून करण्यात आली हत्या

75

या जळीतकांडाच्या गुन्ह्यामध्ये २० संशयित आरोपीना अटक, जळीतकांड राजकीय आणि धार्मिक वादातून नव्हे तर खासगी वादातून झाली असल्याचा अंदाज

 

सिद्धांत
२३ मार्च, मुंबई: पश्चिम बंगालमधील बागुती गावाचे उप-प्रधान भादू शेख यांची सोमवारी संध्याकळी हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावामध्ये तणावाचे वातावरण असतातानाच मंगळवारी गावातील जवळपास १२ घरांना अज्ञातांकडून आग लावण्यात आली. यामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सहा महिलांचा आणि दोन मुलांचा समावेश आहे.

हि घटना कोणत्याही राजकीय आणि धार्मिक वादातून नव्हे तर खासगी वादातून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी सांगितलं आहे. ह्या वादाची सुरुवात भादू शेख यांच्या हत्येपासून झाली. भादू शेख हे गावाचे उप-प्रधान आणि तृणमूल काँग्रेसचे नेते होते. सोमवारी संध्याकाळी बागुती क्रॉसिंगवर असताना चार व्यक्तींनी भादू शेख यांच्यावर गावठी स्फोटकांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या भादू शेख यांचे निधन झाले. हा हल्ला गावातील फतिक शेख आणि सोना शेख यांनी केला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. सोमवारी संध्याकाळपासून ते गावातून बेपत्ता झाले होते.

भादू शेख यांच्या निधनानंतर काही तासानंतरच गावातील काही घरांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ले करून आग लावली होती. यामध्ये फतिक शेख आणि सोना शेख यांच्या घरांचा देखील समावेश होता. या आगीचे प्रमाण इतके भयानक होते कि त्यामध्ये आठ जणांचा घरामध्येच जळून मृत्यू झाला. यामध्ये फतिक शेख याच्या पत्नीचा देखील समावेश आहे.

भादू शेख याचा लहान भाऊ जहांगीर याने माहिती देताना सांगितले कि, माझ्या भावाच्या हत्येनंतर आजुबाजुंच्या गावातील अनेक लोक इथे जमले होते. ते लोक संतप्त झाले होते आणि त्या रागाच्या भरात कुणी काय केले याबद्दल मला माहिती नाही.

बीरभूम जळीतकांड: सहा महिलांसह दोन मुलांची घरासह जाळून करण्यात आली हत्या

एकूणच हाती आलेल्या माहितीनुसार ह्या वदन गटातील कौटुंबिक वाद गेल्या वर्षभरापासून चालत असल्याचे कळते. गेल्यावर्षी भादू शेख यांचा मोठा भाऊ बाबर शेख यांचीही अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती. या दोन गटातील वाद तेव्हापासून धुमसत असल्याची माहिती गावातील लोकांनी वृत्तमाध्यमांनी दिली.

बीरभूम जळीतकांड प्रकरणी भाजप पक्षीयांनी ममता बॅनर्जीच्या सरकारला दोषी मानत बंगालमध्ये राष्ट्रपती लागवट लागू करायचे आवाहन करत आहेत. त्याचवेळी बंगालचे राज्यपालांनी ट्विट करत बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उगारत ममता बॅनर्जींच्या सरकारवर टीका केली. याला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत सांगितले कि, अशा दुर्घटनेचा वापर सरकारवर टीका करून राजकीय फायद्यासाठी करणे चुकीचे आहे. या घटनेचा वापर पश्चिम बंगाल प्रशासनाची बदनामी करण्यासाठी होत असून या गुन्ह्यामागील सर्व आरोपींना आम्ही शोधून काढू.

 

हे आपण वाचलंत का?

 

दरम्यान राजकीय पक्षांकडून या घटनेबद्दल आरोप-दोषारोप चालूच असून यामुळे गावातील वातावरण अधिकच चिघळत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लोक भीतीपोटी गाव सोडून जात असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी आतापर्यंत २० संशयित आरोपीना ताब्यात घेतले असुन पुढील तपास वेगाने चालू आहे.