राज्यात पोलिसांची संख्या अपुरी
एक लाख लोकसंख्येमागे 169 पोलीस
✍रेश्मा माने✍
महाड शहर प्रतिनिधी
86009 42580
महाड : – महाराष्ट्र राज्याची सन 2021 ची अंदाजित लोकसंख्या बारा कोटी 49 लाख असून राज्यातील पोलिसांची संख्या दोन लाख 11 हजार 183 असून एक लाख लोकसंख्येमागे 169 पोलीस उपलब्ध आहेत तर महिला पोलिसांची संख्या राज्यात केवळ 27 हजार 167 इतकी असून राज्याच्या पोलिस संख्याबळाच्या तुलनेत केवळ 12.86% असल्याचे समर्थन संस्थेच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे
राज्यात पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळून दोन लाख 11 हजार 183 पदे मंजूर असून त्यापैकी 83 हजार 618 पोलिसांना केवळ निवासस्थाने उपलब्ध आहेत तर 71 हजार 824 पोलीस राज्यात निवास स्थानापासून वंचित आहेत म्हणजे 34 .1 टक्का पोलीस हक्काच्या निवासस्थानापासून वंचित आहे जगात अव्वल समजल्या जात असणाऱ्या मुंबई पोलिसांचे संख्याबळ केवळ 50 हजार 415 इतकेच आहे त्यातील 22220 पोलिसांना निवासस्थान उपलब्ध असून 28 हजार 195 म्हणजे 55 .93% पोलीस निवासस्थानापासून वंचित आहेत
राज्याची लोकसंख्या व पोलिसांची राज्यातील संख्या बघता राज्य अर्थसंकल्पाच्या शंभर रुपयाच्या तुलनेत गृह विभागाला फक्त पाच रुपये चाळीस पैसे मिळतात मात्र त्यांच्याकडून कामगिरी मात्र कितीतरी पटीने अधिक प्रमाणात करून घेतली जाते सरकार कोणतेही असो पोलिसांना देण्यात येणारे वेतन व सोयी सुविधा व त्यांच्या मार्फत त्यांच्याकडून करून घेण्यात येणारे काम याचा कधीच ताळमेळ बसत नाही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून व सत्तेतील राज्यकर्त्यांकडून पोलिसांना मिळणारी वागणूक व कामाचे ताप यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे
कायदा व सुव्यवस्था राखणे गुन्ह्याचा शोध घेणे गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गुन्हे टाळणे गुन्हेगारांवर खटले भरणे कैद्यांबरोबरच शासकीय मालमत्ता त्याचबरोबर खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणे टोटके व घातक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या व साठवणूक करणाऱ्यांवर देखरेख ठेवणे या व्यतिरिक्त सामाजिक आर्थिक सलोखा राखण्यासाठी पुढाकार घेणे इत्यादी कामे पोलिसांना करावी लागतात
राज्यात मुंबई ठाणे तळो जा येरवडा कोल्हापूर नाशिक रोड औरंगाबाद अमरावती नागपूर मध्यवर्ती कारागृह तर 37 जिल्हा कारागृह तसेच रत्नागिरी विशेष कारागृह मुंबई महिला कारागृह नाशिक किशोरवयीन मुलांसाठी सुधारित कारागृह तर मोर्शी गडचिरोली पैठण येरवडा औरंगाबाद विसापूर अमरावती नागपूर अकोला नाशिक रोड कोल्हापूर येरवडा महिला खुले कारागृह ठाणे यवतमाळ धुळे लातूर रत्नागिरी सिंधुदुर्ग इत्यादी 19 कारागृहे कार्यरत आहेत या सर्व कारागृहातील बंदी शमता 24 हजार 722 असून एकूण बंदी 37 हजार 317 म्हणजे 12 हजार 595 बंदी कारागृहातील क्षमतेपेक्षा जास्त आहेत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हा कारागृह 1 2 व 3 यांची एकत्रित बंदी शमता 23 हजार 942 इतकी होती त्यामध्ये 37 हजार 317 बंदी ठेवण्यात आले होते म्हणजे उपलब्ध क्षमतेपेक्षा दीडशे टक्के म्हणजे 12595 अधिक बंदी कारागृहात अधिक प्रमाणात डांबून ठेवून मानवी हक्क कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते
राज्यातील मध्यवर्ती कारागृह 15500 बंदी शमता असताना 26 हजार 556 बंद ठेवण्यात आले होते म्हणजे 11056 बंदी अतिरिक्त होते तर जिल्ह्यातील इतर कारागृहांमध्ये नऊ हजार 222 कैदी क्षमता असताना दहा हजार 761 कैदी ठेवण्यात आले होते म्हणजे 1539 कैदी अतिरिक्त होते
राज्यात मुंबई व पुण्यासह तुरुंगामध्ये शमते पेक्षा जास्त कैदी असल्याने व तुरुंगाची स्थिती समाधानकारक नसल्याने त्याबाबत चिंता व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई व पुण्यात अतिरिक्त तुरुंगाची उभारणी करण्याकरता राज्यसरकारने तीन महिन्याच्या आत योग्य ती पावले उचलावीत असा आदेश राज्य सरकारला दिला आहे त्याचप्रमाणे राज्यातील तुरूंगात असलेल्या हजारो कायद्यांच्या आरोग्याबाबत जिल्हावार आहार तज्ञांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आकस्मिकपणे तपासणी करावी असे आदेश असतानाही मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही
देशात गुन्हेगारीत महाराष्ट्र पाचव्या स्थानी
देशात ज्याप्रमाणे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे ही घटना गंभीर असून महाराष्ट्र पाचव्या स्थानी असल्याने त्याहून गंभीर असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे सन 2020 मध्ये संपूर्ण भारतात 66 लाख 1285 पुण्याची नोंदणी त्यात तामिळनाडू मध्ये 13 लाख 77 हजार 681 मध्यप्रदेश मध्ये सहा लाख 99 हजार 619 उत्तर प्रदेश मध्ये सहा लाख 57 हजार 925 केरळ मध्ये पाच लाख 54 हजार 424 तर महाराष्ट्रात पाच लक्ष 39 हजार तीन इतके गुन्हे नोंद करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्र गुन्हेगारी बाबतीत पाचव्या स्थानावर असल्याचे सिद्ध झाले आहे
सन 2019 मध्ये महाराष्ट्रात पाच लाख 9 हजार 433 गुन्ह्यांची नोंद झाली तर 2019 च्या तुलनेत सन 2020 मध्ये पाच लक्ष 39000 तीन इतक्या गुन्ह्यांची नोंद झाली 29 हजार 570 इतके गुन्हे अधिक महाराष्ट्रात घडले महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण 5. 49 टक्के आहे
महिला अत्याचारात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
सन 2020 मध्ये भारतात महिलांवरील अत्याचाराचे तीन लाख 71 हजार 503 एवढ्या गुन्ह्यांची नोंद झाली त्यामध्ये प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश या ठिकाणी 49 हजार 385 म्हणजे 13 . 29% टक्के दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान असून या राज्यात 34 हजार 535 उत्तर महाराष्ट्रात 31 हजार 954 गुन्ह्यांची नोंद झाली एकंदरीत महाराष्ट्र महिला अत्याचारांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे
सन 2020 मध्ये मुलांवरील अत्याचारात देशभरात एक लाख 28 हजार 531 गुन्हे नोंदविले गेले त्यापैकी सर्वाधिक जास्त मध्य प्रदेशात 17008 म्हणजे 13 . 23 टक्के उत्तर प्रदेशात 15,000 271 म्हणजे 11. 88 टक्के तर महाराष्ट्रात 14371 म्हणजे 11.8 टक्के गुन्हे नोंद झाली
अनुसूचित जातीच्या व्यक्तींवर देशात 50 हजार 291 गुन्हे नोंदविले गेले त्यापैकी महाराष्ट्रात 2569 म्हणजे 5.11 टक्के गुणांची नोंद केवळ महाराष्ट्रात झाली अनुसूचित जमाती वरील देशात आठ हजार 272 गुन्हे नोंदविले त्यापैकी मध्यप्रदेशात 2401 म्हणजे 29 .2 टक्के राजस्थान मध्ये 1878 म्हणजे 22. 70 टक्के तर महाराष्ट्रात 663 म्हणजे केवळ 8.1 टक्के गुन्ह्यांची नोंद झाली भारतात ज्येष्ठ नागरिकांवर 24 हजार 794 गुन्हे नोंदविले गेले त्यापैकी सर्वात जास्त 4909 गुन्हे महाराष्ट्रात नोंदविले गेले त्यांचे प्रमाण 19. 80 टक्के होते
आर्थिक गुन्हेगारीची भारतात एक लाख 45 हजार 754 प्रकरणे नोंदवली गेली त्यापैकी सर्वात जास्त राजस्थान मध्ये 18 हजार 528 म्हणजे 12. 71 टक्के उत्तर प्रदेश मध्ये 16 हजार 708 म्हणजे 11.46% टक्के तर तेलंगणामध्ये 12985 म्हणजे 8. 91% टक्के तर महाराष्ट्रात 12453 म्हणजे 8.54टक्के प्रकरणे नोंदवली गेली
भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल स्थानी
भ्रष्टाचारामध्ये देशात हाहाकार माजला असताना महाराष्ट्र देखील त्यात कमी नाही भ्रष्टाचाराच्या देशात तीन हजार 100 इतक्या गुन्ह्यांची यांची नोंद झाली त्यापैकी महाराष्ट्रात 664 म्हणजे 21. 42 टक्के गुन्हे नोंदविले गेले त्यामुळे भ्रष्टाचार प्रकरणात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे निष्पन्न झाले आहे सायबर क्राईम के देशात 50000 535 एवढ्या गुन्ह्यांची नोंद झाली त्यापैकी उत्तर प्रदेशात 11097 असून उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर असून त्याचे प्रमाण 22.18 टक्के आहे तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून या राज्यात 10 हजार 741 म्हणजे21.47% टक्के र तिसर्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य असून या ठिकाणी पाच हजार 496 म्हणजे दहा पॉईंट 98 टक्के गुन्ह्यांची नोंद झाली राज्य विरोधात भारतात 5613 गुन्हे नोंदविले गेले त्यात प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश असून 2217 म्हणजे 39 .50 टक्के तर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य असून या ठिकाणी 668 गुन्हे नोंदविले गेले त्याचे प्रमाण 11. 90 टक्के तिसऱ्या क्रमांकावर आसाम राज्य असून त्या ठिकाणी 333 म्हणजे 5.93 टक्के तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून 252 म्हणजे 4. 49 टक्के गुन्हे नोंद नोंद करण्यात आले