मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पुणे शहरात भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्याच्या राज ठाकरेंच्या आदेशाला पाळायला दिला होता नकार

सिद्धांत
७ एप्रिल, मुंबई: राज ठाकरेंचे शिवाजी पार्कवर पाडवा मेळाव्याच्या वेळी झालेले भाषण त्यांनी केलेल्या अनेक विधानांसाठी वादग्रस्त ठरले होते. त्यावेळी त्यांनी राज्यामध्ये मस्जिदवर दिवसभरामध्ये होणाऱ्या आझान लाऊडस्पीकर वरून प्रक्षेपित करण्यास बंद करावे, अन्यथा मस्जिदीसमोर तेवढ्याच आवाजामध्ये आम्ही लाऊड स्पीकरवरून हनुमान चालीसा लावू असे विधान केले होते.
या विधानावरून अनेक लोकांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. हिंदू -मुस्लिम असे धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण महाराष्ट्रात सुरु करणाऱ्या त्याच्या या कृतीला सत्ताधारी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी विरोध केला. इतकेच काय तर स्थानिक पातळीवरील मनसे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही राज ठाकरेंच्या या विधानामुळे नाराजी पसरली होती. त्यापैकीच एक होते मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे.
राज ठाकरेंच्या आदेशाविरोधात भूमिका घेऊन त्यांनी आपल्या भागात मस्जिदीवरील भोंगे हटणार नाहीत आणि मस्जिदींसमोर हनुमान चालीसा लावली जाणार नाही, असे जाहीर केले होते. यानंतर पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी वसंत मोरे अनुपस्थित होते. बैठकीदरम्यान मनसे पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरेंना हटवण्यात आले आणि त्यांच्याजागी संभाजी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली.
या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का ?
- मशिदीच्या भोंग्यावरून ‘राज’कारण तापलं; सुजात आंबडेकरांनी अमित ठाकरेंना दिले ‘हे’ आव्हान
- महाराष्ट्रातील उल्का आणि अंतराळातील कचरा
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
पदावरून काढल्यानंतर वसंत मोरे यांनी नवनियुक्त संभाजी बाबर यांच्यासोबतच एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. यामध्ये ते मावळ्याच्या वेशात असून संभाजी बाबर महाराजांच्या वेशात दिसत आहेत. तसेच अभिनंदन करताना, ” अरे मी तर कधीपासूच तुझा मावळा आहे” अश्या शब्दात फोटोला कॅप्शन देत वसंत मोरे यांनी संभाजी बाबर यांचे अभिनंदन केले आहे.
"अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!
खूप खूप अभिनंदन साई!@Sainathbabar7 pic.twitter.com/Qkar8mCakS— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 7, 2022