अवकाशीय अवशेषाची पहाणी करण्यासाठी इस्त्रोची टीम चंद्रपूर जिल्ह्यात दाखल
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर : जिल्ह्यात सिंदेवाही, ब्रम्हपुरी, चिमूर तालुक्यात अवकाशातून पडलेल्या अवशेषाचु श तपासणी करण्याकरिता इस्त्रोची टीम चंद्रपूर जिल्ह्यात आज (8 एप्रिल) ला दाखल झाली असून सिंदेवाही येथे पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या अवशेषांची त्यांनी तपासणी सुरू केली.
मागील आठवड्यात आकाशातून अवशेष पडत असल्याचे दृश् उभ्या महाराष्ट्राने पाहिले. हे अवशेष चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लगत पडले. प्रशासनाने हे अवशेष पोलीस स्टेशन मध्ये जमा करून या अवशेषांची तपासणी करण्याकरिता इस्रोला विस्तृत इमेल केला.
इस्रोच्या पथक येऊन यावर्षीची याची तपासणी करतील असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार आज हे पथक येथे दाखल झाले असून याची तपासणी सुरू केली आहे.