शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला यावर्षी ज्योतिरादित्य सिंदिया यांची उपस्थिती १६ एप्रिलला रायगडवर आयोजन

शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला
यावर्षी ज्योतिरादित्य सिंदिया यांची उपस्थिती
१६ एप्रिलला रायगडवर आयोजन

शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला यावर्षी ज्योतिरादित्य सिंदिया यांची उपस्थिती १६ एप्रिलला रायगडवर आयोजन

✍ रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : १६ एप्रिल रोजी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने किल्ले रायगडवर ३४२ व्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या कार्यक्रमाला केंद्रिय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे उपस्थित राहणार आहेत. इतिहासकालीन सरदार आणि ग्वाल्हेर संस्थानाचे संस्थापक महादजी शिंदे यांचे ज्योतिरादित्य हे वंशज आहेत.

किल्ले रायगडवर 16 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या अभ्ािवादन कार्यक्रमाला ना. ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या समवेत रायगडच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे,आ. भरतशेठ गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, आ. रविशेठ पाटील, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, आ. महेश बालदी, आ. विनायक मेटे, निजामपूरच्या सरपंच प्रेरणा सावंत आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात भाररतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना अकरावा श्री शिवपुण्यस्मृती, रायगड या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारर आहे. त्याचप्रमाणे तानाजी मालुसरे यांच्या सर्व वंशजांचा सरदार घराणे म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, कार्यवाह सुधीर थोरात, सहकार्यवाह पांडूरंग बलकावडे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित आणि कार्यवाह संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली या अभिवादन कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.