समलिंगी तरुणींना एकत्र राहण्यासाठी मिळाले कायद्याचे संरक्षण

समलिंगी ( लेस्बियन ) कपल चा कायदेशीर लिव्ह इन रिलेशनशिपचा करार

समलिंगी तरुणींना एकत्र राहण्यासाठी मिळाले कायद्याचे संरक्षण

मीडिया वार्ता न्युज
९ एप्रिल, नागपूर: राईट टू लव्ह ने काल दि. ७ एप्रिल रोजी समलिंगी ( लेस्बियन ) कपल चा कायदेशीर लिव्ह इन रिलेशनशिप चा करार करून दिला. अशा प्रकारचा करार करण्याची बहुधा हि पहिलीच घटना असावी. या करारामुळे त्यांना एकत्रित राहण्यासाठी कायद्याचा आधार मिळणार आहे.

नागपूर आणि गोंदिया या ठिकाणची हि जोडी असून गेल्या सव्वा महिन्यापासून संपर्कात होती. दोघींचं एकमेकींवर जीवापाड प्रेम. त्यांच्या प्रेमाला दोन्ही घरच्यांचा विरोध होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हे प्रकरण पोलिस स्टेशनला गेलं होतं. दोघी सज्ञान असून देखील पोलिसांनी त्यातील एकीला घरच्यांबरोबर जाण्याचा सल्ला दिला परंतु रात्री २ वा. आम्ही पोलिसांबरोबर कायद्याचा आधार घेऊन बोललॊ. त्यांना पटवून दिले आणि पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं.

राईट टू लव्ह चे कायदेशीर सल्लागार एड. विकास शिंदे यांनी हा करार करताना या समलिंगी जोडीला कुणी धमकी अगर कुणाचा दबाव आला तर त्यांना या कराराद्वारे कायदेशीर संरक्षण मिळणार असल्याचे सांगितले. संबंधित जोडी याद्वारे न्यायालयात संरक्षण देखील मागू शकतात.

हे आपण वाचलंत का?

 

राईट टू लव्ह गेल्या सात वर्षांपासून जात, धर्म, लिंग, आणि गरीब श्रीमंतीच्या भिंती तोडणाऱ्या जोडप्यांच्या प्रेमाला पाठिंबा देत आहे. अशा जोडप्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही अविरतपणे करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here