जखमी असुनही अपघातग्रस्त दुसरा युवक चढला धावत्या ट्रकवर, ट्रकचालकाने केले स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं ९५१८३६८१७७
राजुरा तालुक्यातील सोनुर्ली येथिल आकाश मारोती ढोले (16) व त्याचा मामा नागेश मोहन आदे हे दोघेही सकाळी 9 वाजताच्या सुमारास सोंडो येथून सोनुर्ली येथे जात असताना झालेल्या भिषण अपघातात सोळा वर्षीय आकाश ह्याचा जागीच मृत्यु झाला असुन नागेश किरकोळ जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार दोघेही मामा भाचे सोनुर्ली कडे जात असताना गावाच्या जवळच असलेल्या नाल्याच्या पूलआधी असलेल्या गतिरोधका जवळ नागेश ह्याने दुचाकीचा वेग कमी केला मात्र मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या निर्भय ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.
ट्रकची धडक बसताच दुचाकी चालक नागेश आदे बाजुला फेकल्या गेला तर मागे बसलेला आकाश ढोले हा 16 वर्षीय नवयुवक खाली पडला. मागुन येणाऱ्या ट्रकचे काही चाक आकाश ह्याचे अंगावरून गेल्याने आकाश जागीच गतप्राण झाला. ही धडक इतकी जोरदार होती की नागेश ह्याची स्प्लेंडर प्रो दुचाकीचा पार चेंदामेंदा झाला असुन नशीब बलवत्तर म्हणुन नागेशचे प्राण वाचले.
अपघात होताच भांबावलेल्या ट्रक चालकाने ताबडतोब ट्रक घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखुन त्याच अपघातात जखमी अवस्थेतील नागेश आदे ह्याने ट्रक कडे धाव घेतली. दरम्यान ट्रकने वेग घेतला होता तरीही नागेश ह्याने ट्रक चा धावत सिनेस्टाईल पाठलाग करून ट्रकवर चढला व ट्रक थांबविण्यासाठी आरडाओरडा करू लागला. ट्रकचालकाने मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून तब्बल 14 किलोमीटर पर्यंत ट्रक पळवून राजुरा येथे आणला व थेट पोलीस ठाण्यात उभा करून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केल.
या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली लोकशाही
- काय आहे भारतातील ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन यांसारख्या अल्पसंख्यांक समाजातील साक्षरतेचे प्रमाण?
- छत्रपती शिवाजी महाराज, सामर्थ्यशाली व प्रागतिक राज्य निर्माते
घटनेची माहिती मिळताच विरूर स्टेशन पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविण्यात आला. दरम्यान झालेल्या घटनेने जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला असुन मृतकाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली अखेर पोलिसांनी सर्वांना समजावुन मृतदेह बाजुला केला. वृत्त लिहीस्तोवर पोलीस कारवाई पुर्ण झाली असुन पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.