रायगडला जेव्हा जाग येते या विषेश नाट्यप्रयोगाचे आयोजन रायगड किल्ल्यावर करण्यात आले

रायगडला जेव्हा जाग येते या विषेश नाट्यप्रयोगाचे आयोजन रायगड किल्ल्यावर करण्यात आले

रायगडला जेव्हा जाग येते या विषेश नाट्यप्रयोगाचे आयोजन रायगड किल्ल्यावर करण्यात आले

✒राकेश सुरेश देशमुख ✒
महाड ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7887879444

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यवर्ष आणि जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई विभाग व मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्यशाखा, रंगमच सह्योगाने “रायगडला जेव्हा जाग येते” या विशेष नाट्य प्रयोगाचे आयोजन आज रायगड किल्ल्यावर करण्यात आले होते. यावेळी डॉ. नंदिनी भट्टाचार्य साहू, पुरातत्व विभागाचे अधिक्षक डॉ. राजेंद्र यादव, श्री. प्रमोद पवार, श्री. उपेंद्र दाते, प्रांताधिकारी, तहसिलदार, शिवप्रेमी यांची उपस्थिती होती. रायगडवर आल्यावर जेव्हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर नतमस्तक होतो त्यावेळेस आपणा सर्वांना या भूमीत जन्माला आल्याचा अभिमान वाटतो. जगाच्या पाठीवर असा कुठलाही राजा नसावा ज्यांची जयंती आपण चारशे वर्षांनंतरही एवढ्या उत्साहाने साजरी करतो. हा इतिहास जोपासण्यासाठी पुरातत्व विभागाने याठिकाणी प्रयत्न केले आहेत. केंद्र व राज्य शासनामार्फत तसेच रायगड प्राधिकरणामार्फत हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न करीत आहोत. रायगडचा जाज्वल इतिहास पुन्हा दाखविण्याचा प्रयत्न पुरातत्व विभागाकडून करण्यात येत असल्याचा आनंद आहे. भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास यानिमित्ताने अनुभवायला मिळेल. या नाट्याच्या माध्यमातून शिवरायांबद्दल बालपणापासून रूजलेले स्थानात अधिक ज्ञानाची भर होणार आहे. रायगड जिल्ह्यातील इतर किल्ल्यांचे देखील संवर्धन करून त्यांचे अनेक वैशिष्ट्ये असून तेथील इतिहास व माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होईल. यासाठी पुरातत्व विभागाने प्रयत्न करावे, अशी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here