केरळची ही खरी ‘केरळ स्टोरी’ तुम्हाला माहित आहे का?

मनोज कांबळे: केरळ स्टोरी या वादग्रस्त चित्रपटामुळे सध्या केरळ राज्य सध्या भारतभर चर्चेत आहे. केरळ राज्यामधून ३२ हजार हिंदू मुलीचे धर्मांतर करून त्यांना आयसीस दहशतवादी संघटनमध्ये पाठवल्याची सत्यकथा या चित्रपटामधून मांडली असल्याचे दिग्दर्शकाचे म्हणणे होते. परंतु चित्रपटामध्ये मांडलेल्या आकडेवारीवरून कोर्टाने पुरावा मागितल्यावर निर्मात्यांनी आपली चूक मान्य करून, ही कथा केवळ 3 मुलींची असल्याचे सांगितले.

केरळ स्टोरी सारखी खोटे कथानक मांडणाऱ्या चित्रपटामुळे केरळ सारख्या प्रगत राज्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणे, सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून भाजपा सारखा पक्ष चित्रपटाचा राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप सर्वसामान्य भारतीयांकडून होत आहे.

केरळ वासियांकडून या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. खोटी केरळ स्टोरी पाहण्यापेक्षा खरी केरळ स्टोरी भारतीयांनी पहावी, आहे त्यांची मागणी आहे..काय आहे ही खरी केरळ स्टोरी?

ही आहे केरळच्या विकासाची स्टोरी…भारत देशातील सर्वात प्रगत राज्य असल्याची स्टोरी

– केरळ देशातील सर्वात साक्षर राज्य आहे.

– केरळमधील नागरिकांचे सरासरी आर्युमान देशात सर्वात जास्त आहे.

– ६ वर्षांवरील शाळेत जाणाऱ्या मुलींचे प्रमाण केरळमध्ये ९५.५ टक्के आहे. तर भारतामध्ये याचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास आहे.

– स्त्री भ्रूण हत्येचे भारतातील प्रमाण अजूनही गंभीर असताना केरळ मात्र यामध्ये अत्यंत प्रगत असल्याचे दिसून येते. भारतात १००० पुरुषांच्या तुलनेत १०२० स्त्रिया आहेत, तर हेच प्रमाण केरळ मध्ये हे प्रमाण ११२१ इतके आहे.

– स्त्री साक्षरतेचे प्रमाण केरळ मध्ये ९८ टक्के असून भारतामध्ये ते कमी म्हणजे ७१ टक्के आहे.

– केरळमध्ये बालविवाहाचे प्रमाण कमी म्हणजे ६ टक्के असून भारतातील सरासरी प्रमाण २३ टक्के आहे.

– केरळमधील बाल मृत्यूदर अमेरिका आणि इतर प्रगत देशांपेक्षा कमी आहे. केरळमध्ये दर हजार जन्मामागे बाल मृत्यू दर ४.४ आहे, तर भारताचा बाल मृत्यूदर दर हजारामागे ३५ इतका जास्त आहे.

– केरळमध्ये माता मृत्यूदर १९ आहे तर भारताचा सरासरी माता मृत्यूदर ९७ आहे.

– मानव विकास निर्देशांक मध्ये केरळ भारतातील क्रमांक एकचे राज्य आहे.

– घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांचे प्रमाण भारतामध्ये ३० टक्के इतके आहे, हेच प्रमाण केरळमध्ये कमी म्हणजे १० टक्के आहे.

– केरळमध्ये ९७ टक्के घरांमध्ये आधुनिक शौचालये आहेत तर भारतामध्ये सरासरी प्रमाण ७० टक्के आहे.

– केरळ मधील व्यक्तीचे  दरडोई उत्पन्न उर्वरित भारताच्या सरासरीपेक्षा दीडपट आहे.

– आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार २०२१ – २२ मध्ये केरळचा आर्थिक वृद्धीदर १२.१ टक्के होता, तर संपूर्ण भारत देशाचा ८.७ टक्के होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here