द केरला स्टोरी काल्पनिकच, ती सत्यकथा नाही… कोर्टाने दिले दोन महत्त्वाचे आदेश

मनोज कांबळे: द केरला स्टोरी या चित्रपटावरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर भारतात हा चित्रपट चांगली कमाई करत असला तरी दक्षिण भारत, बंगाल सारख्या राज्यात या चित्रपटाला तेथील जनता आणि सरकारकडून सुद्धा विरोध होत आहे.

या चित्रपटातून ३२ हजार हिंदू मुलींचे धर्मांतर करून ISIS या दहशतवादी संघटनेशी जोडले गेल्याचे कथानक सत्यकथा म्हणून मांडण्यात आली होती. लोकांनी आवाज मुळात चित्रपट निर्मात्यांनी कोर्टामध्ये चित्रपटाचे कथानक काल्पनिक आहे असे मान्य केले होते. परंतु राजकीय नेते मुख्यत: भाजप नेते आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या चित्रपटाचे सत्यकथा प्रमोशन केल्याने जाणकार लोकांमधून या विरोधात आवाज उठवला गेला.

अशा वादग्रस्त चित्रपटांमुळे समाजात तेढ निर्माण होत असून त्याला आला घालण्यासाठी अखेर कोर्टाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे.

 द केरला स्टोरी हा चित्रपट चालवण्यापूर्वी स्क्रीनवर खास पट्टी चालवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या पट्टीतून खालील माहिती लोकांसमोर मांडण्याचे आदेश दिले आहेत.

1. या चित्रपटात सांगितल्या प्रमाणे धर्मांतरित लोकांचा 32000 किंवा इतर कोणताही आकडा आहे या सूचनेचा बॅकअप घेण्यासाठी कोणताही प्रामाणिक डेटा नाही.

2. चित्रपट हा विषयाच्या काल्पनिक आवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो.

राजकीय फायद्यासाठी द केरला स्टोरी सारख्या समाजात चुकीचे समज पसरवणाऱ्या चित्रपटांचा फायदा घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांवर जाणकार नागरिकांकडून टीका केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here