मुंबईत चार फ्लॅट्स, लाखोंची घड्याळे, परदेश प्रवास…समीर वानखेडे यांचा भ्रष्टाचार होतोय उघड? एनसीबीच्या तपासात समोर आल्या ‘या’ धक्कादायक गोष्टी…

मनोज कांबळे: एजन्सीने समीर वानखेडे आणि इतर काही जणांवर शाहरुख खानच्या कुटुंबाकडून 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप केला आहे, अन्यथा ते आर्यन खानला कथित ड्रग बस्टमध्ये अडकवतील अशी धमकी दिली त्यांनी शाहरुख खानच्या कुटुंबाला दिली होती.

युनायटेड किंगडममध्ये फक्त एक लाख रुपयांत १९ दिवस घालवता येतील का? समीर वानखेडेविरुद्ध एनसीबीच्या दक्षता तपासात वानखेडे यांनी युनायटेड किंग्डमचा 19 दिवसांचा खर्च केवळ एक लाख रुपये सांगितल्याचे निष्पन्न झाले.. या दक्षता अहवालात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्याबद्दल आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

कर्डिलिया ड्रग्ज क्रूझ प्रकरणात शेवटच्या क्षणी आर्यन खान आणि अरबाज मर्चंटची नावे वानखेडेने जोडली होती आणि ज्यांच्याकडून रोलिंग पेपर सापडला होता अशा लोकांना क्लीन चिट देऊन जाण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी किरण गोसावी यांना वानखेडे यांनी नियमांचे उल्लंघन करण्याची मोकळीक दिली होती. तसेच ज्या रात्री आर्यन खानला एनसीबी कार्यालयात आणण्यात आले, त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज करप्ट झालेले होते. तसेच एनसीबीच्या तपास पथकाला दिलेली हार्ड कॉपी आणि डीव्हीआर कॉपी वेगळी असल्याचे दिसून आले आहे.

एनसीबीच्या अहवालात वानखेडे यांच्या परदेश दौऱ्यांबाबत आणि त्यांच्या बेनामी संपत्तीबद्दल अनेक खुलासे झाले आहेत.

2017 ते 2017 पर्यंत वानखेडे आपल्या कुटुंबासोबत 6 परदेश दौऱ्यावर गेले आणि या सहलींमध्ये 55 दिवस परदेशात असतानाही एकूण खर्च केवळ 8.75 लाख रुपये झाला, अहवालानुसार या पैशात फक्त हवाई प्रवासाचा खर्च समाविष्ट आहे. या भेटींचा नेमका तपशील देण्यात आलेला नाही. केवळ 8.७५ लाखात परिवारासह 55 दिवस परदेश प्रवास करणे अशक्य असल्याने, याप्रकरणात वानखेडे कुटुंबावर संशय वाढला आहे.

हे आपण वाचलंत का?

वानखेडे यांनी विरल जमालुद्दीन राजन नावाच्या व्यक्तीकडून 22.5 लाख रुपयांचे सोन्याचे रोलेक्स घड्याळ 17 लाख रुपयांना कर्जावर विकत घेतले. दुसरीकडे, वानखेडे यांनी स्वत:ची 4 घड्याळं विकली, तेव्हा त्यांना याच विरल जमालुद्दीन राजनकडून लगेचच 7.40 लाख रुपये मिळाले.

1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2020 नुसार समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांचे एकूण उत्पन्न 45 लाख 61 हजार 460 आहे. परंत्तू चौकशीमध्ये त्यांच्याकडे मुंबईत चार फ्लॅट्स आणि वाशिममध्ये 41,688 एकर जमीन आहे.समीर वानखेडे यांनी दावा केला आहे की त्यांनी गोरेगावमधील पाचव्या फ्लॅटसाठी ₹ 2.45 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने लग्नापूर्वी ₹ 1.25 कोटींना खरेदी केलेल्या फ्लॅटचाही उल्लेख आहे.

परंतु समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांचे एकूण उत्पन्न आणि त्यांचा परदेश प्रवास आणि संपत्तीसाठी केलेला खर्च याचा मेळ बसत नसल्याने त्यांच्यावर सरकारी अधिकारी म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप अधिक गडद होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here