सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की करते तरी काय? दिशा फलक नाहीत अपघाताची मालिका चालूच

सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की करते तरी काय? दिशा फलक नाहीत अपघाताची मालिका चालूच

सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की करते तरी काय? दिशा फलक नाहीत अपघाताची मालिका चालूच

सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की करते तरी काय? दिशा फलक नाहीत अपघाताची मालिका चालूच

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ :- कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने नेरळ पोलीस स्टेशन ब्रिजवर कोणतेही वळणाचे चिन्ह न लावल्यामुळे अपघाताच्या संखेमध्ये वाढ होत आहे. नेरळ कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ पोलीस ठाणे जवळील नवीनब्रिज होऊन बरेच दिवस झाले आहेत परंतु रात्रीच्या वेळेस येथे पथ दिवे नसल्याचे अंधारच असतो. रिफ्लेक्टर किव्हा वळणाचे चिन्हं नसल्यामुळे ब्रिज जवळ कर्जत कडून बदलापूरच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर डाव्या बाजूला वळण असे कोणतेही चिन्ह लावले नाही तसेच नेरळ येथून कर्जत येथे जाताना ब्रिजवर वळणाचे चिन्ह न लावल्यामुळे अपघाताची मालिका चालूच आहे.

त्या मध्ये नेरळ पोलीस पोलीस ठाणे येथे स्पीड ब्रेकर येथे खड्डा झाल्यामुळे जो तो खड्डा वाचवण्यासाठी वेडी वाकडी गाडी चावत असून वाहतुक कोंडी व अपघाताची मालिका सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम अधिकारी कर्जत यांचे म्हणणे आहे कि हा रस्ता आमच्या अंतर्गत नाही. बरेच वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांच्या कडे कर्जत प्रेस असोशीयशान उपअध्यक्ष यांनी ह्या बाबत विनंती करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने वळण दिशा चिन्ह नलावल्यामुळे अपघाताच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.

माथेरान ते कर्जत येथील तिव्र उतार आहे (एल. ई. एस शाळेजवळ) रस्ता दुभाजक आहे येथेही दिशादर्श/रिफ्लेक्टर न बसविण्यात आल्यांने बरेच अपघात झाले आहेत. नागरिकांची मागणी असून देखील सार्वजनिक भांधकाम कधी आपली कामे वेळेवर करेल व अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत करेल ह्या कडे नेरळकराचे लक्ष वेधून आहे.