संगमनेरमध्ये दरोड्याच्या प्रयत्नात भरदिवसा एका महिलेचा खून.

52

संगमनेरमध्ये दरोड्याच्या प्रयत्नात भरदिवसा एका महिलेचा खून.

अहमदनगर :- गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अहमनगरमध्येही दरोड्याच्या प्रयत्नात भरदिवसा एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात ही घटना घडली असून, या घटनेनं आजूबाजूचा परिसर हादरून गेलाय. दागिने लुटण्याच्या उद्देशाने दुपारच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला असून, सावित्रीबाई शेळके या 80 वर्षीय वृद्धेचा खून करण्यात आलाय. तसेच चार वर्षीय मुलीच्या कानातील दागिने ओरबडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या‌त मुलगी जखमी झालीय.

चोरीच्या उद्देशाने गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनीसुद्धा घटनास्थळाला भेट दिलीय. आरोपींच्या‌ शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

मोबाईल देत नसल्याच्या रागात मुलाने बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगण चोपायच्या चोपणी डोक्यात वार केल्याने बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मुंबईतील काम सुटल्याने आरोपी मुलगा भावेश हा आपल्या वडिलांसोबत राहत होता. वडील भागुराम माझा मोबाईल देत नाहीत, या एका क्षुल्लक कारणामुळे त्यांच्या वाद व्हायचे. काल रात्री 8 च्या सुमारास भावेश आणि वडिलांचा वाद झाला. त्यावेळी भावेशला राग अनावर झाला. त्याने दारूच्या नशेत जन्मदात्या बापाला अंगण चोपण्यासाठी वापरात येणाऱ्या चोपणीने वार केले. यात भागूराम यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने हा प्रकार कोणालाही समजला नाही.