नागपूरः राजस्थानवरून मैत्रिणीकडे आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्या पतीनंच तरुणीवर अत्याचार.
नागपूरः- राजस्थानवरून मैत्रिणीकडे आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्या पतीने अत्याचार केल्यानं एकच खळबळ उडालीय. नागपूरच्या गिट्टी खदान हद्दीत ही घटना घडली. तसेच मैत्रिणीने सदर प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी धमकी दिली. त्यानंतर अत्याचार झालेल्या तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मैत्रिणीच्या पतीने पाहुणी म्हणून आलेल्या तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय,16 तारखेला राजस्थानवरून एक तरुणी नागपूरला आपल्या मैत्रिणीकडे आली होती, तिला आपली प्रॉपर्टी विकायची होती, ती रात्री मैत्रिणीच्या घरी थांबली.
रात्री रूममध्ये झोपली असताना मैत्रिणीचा पती पहाटे तिच्या खोलीत गेला, त्याच्या सोबत त्याचा मित्र पण होता. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला, तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून आरोपीच्या मित्राने मोबाईलवर गाणे वाजवायला सुरुवात केली, मात्र आवाज येत असल्याने त्याची पत्नीसुद्धा तिथे आली आणि झालेल्या प्रकरणाची माहिती कोणाला द्यायची नाही, अशी धमकी तिच्या मैत्रिणीनं दिली. सकाळ होताच त्या तरुणीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली, यावरून पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता मैत्रिणीच्या पतीला आणि मित्राला अटक केली.
सदर प्रकरण गंभीर असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, मात्र या प्रकरणात मैत्रिणीने आपल्या घरी विश्वासाने आलेल्या मैत्रिणीला साथ देण्यापेक्षा पतीला साथ देत तिला धमकी दिल्याने तिलासुद्धा आरोपी करण्यात आलेय, मात्र मैत्री शब्दाला यामुळे काळिमा फासला गेलाय.