सरकारी आश्रमातील पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एका मुलींची आत्महत्या.
मध्यप्रदेश:- मध्ये एक व्यक्तीने पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला आहे. त्यापैकी एका पीडितेने आत्महत्या केली आहे. पाच अल्पवयीन तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे
मिळालेल्या माहितीनुसार भोपाळमध्ये प्यारे मियां नावाचा व्यक्ती एक वृत्तपत्र चालवत होता. या व्यक्तीने सरकारी आश्रमातील 5 अल्पवयीन मुलींवर जुलै 2020 मध्ये बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करत आरोपी प्यारे मियांला अटकही करण्यात आली होती. बुधवारी पाच पीडितेपैकी दोन पीडित मुलींनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता एका मुलीची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.