सौंदड येथिल जनशक्ति युवा पॅनलचा स्तृत्य उपक्रम, श्रमदान निर्मित बंधारा, करेल पाणी टंचाईवर मात.
टी. बी. सातकर
सौंदड:- येथे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सौंदड येथील चुलबंद नदी पात्रात जनशक्ती युवा पॅनलच्या पुढाकाराने श्रमदानातून सौंदड ग्रामवासियांनी १०० मीटर लांबीचा बंधारा बांधला त्यांच्या या स्तृत्य उपक्रमामुळे सौंदड ग्राम पाणी टंचाईपासून मुक्त राहणार आहे.
रविवार दिनांक १७ जानेवारीला एक दिवसीय श्रमदानात सौंदड येथील शेकडो महिला, पुरुष व युवकांनी एकत्रीत येऊन बंधारा निर्मिती केली. सौंदड गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या वर असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याच चुलबंद नदीच्या पात्रातून ग्रामपंचायतद्वारे करण्यात येतो. गावात ७०० च्या जवळपास खाजगी नळधारक असून ३ हजार ५०० ते ४ हजार नागरिकांना दररोज २ लाख ४० हजार लिटर पाणी मिळत असतो. परंतु नदीपात्रात कायमस्वरुपी बंधारा नसल्याने उन्हाळ्यात सौंदडच्या नागरिकांना पाणी टंचाई भासायला नको या उद्देशाने जनशक्ती युवा पॅनल, युवा नेटवर्क मैत्री मंच व युवारत्न संघटनच्या महिलांनी व युवकांनी एक हजार पिशव्यांमध्ये वाळू भरून बंधारा निर्मिती केले आहे.
मागील वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ लागु करण्यात आल्याने बंधारा बांधणे शक्य झाले नसल्याने मध्यंतरी नदीचे पात्र कोरडे झाले होते त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी युवा शक्ती मंच व जनशक्ती युवा पॅनलच्या युवा कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ६००फुट लांब व ८ ते ९ फुट रूंद नदीचे पात्र दहा फुटाचे खोलीकरण दोन दिवसात पुर्ण करुन मागील वर्षी देखील सौंदड गावातील नागरीकांना पाणी टंचाई भासु दिली नाही.
उन्हाळ्यात नदिपात्र कोरडे पडत असते ही समस्या लक्षात घेऊन लोकनियुक्त सरपंच तथा जनशक्ती युवा पॅनलच्या संस्थापक मा. गायत्री इरले यांच्या नेतृत्वात श्रमदानातून बंधारा निर्मितीचा उपक्रम घेण्यात आला यात जनशक्ती युवा पॅनलचे सचिव रोशन शिवनकर, नंदकिशोर डोंगरवार, लालचंद खडके, रंजना भोई, मिनाक्षी विठ्ठले, दुर्गा ईरले, माधवी शैलेश विठ्ठले, अशोक विठ्ठले, माधुरी यावलकर, गीता मेश्राम, दिक्षा बडोले, संगीता राऊत, स्वाती कोरे, विनोद नंदरधने, दिलीप डोंगरावर, युनेश भेंडारकर, विजय नगरकर, आशिष राऊत, शैलेश राऊत, सुषमा डोये, रूपेश राऊत, ज्योती बर्वे, किरन भुमके, अंजु इरले, लता हटकर, पेमु इरले, राजेश भुसारी, नमिता भेंडारकर, रंजीत चुटे, सुभाष टेंर्भुणे, टिकाराम पातोडे यांच्यासह गावातील शेकडो महिला, पुरुष व युवकांनी सहभाग घेतला.
यावेळी बंधारा निर्मितीच्या कार्यात सहभागी नागरिकांसाठी जनशक्ती युवा पॅनलकडुन भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.