व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या पत्नीने चक्क तिच्या नवऱ्यालाच स्पिरीटने पेटवलं.

51

व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या पत्नीने चक्क तिच्या नवऱ्यालाच स्पिरीटने पेटवलं.

जालंधर:- घरगुती अत्याचार किंवा हिंसाचाराला बळी पडणाऱ्या केवळ महिलाच नाही तर पुरूष देखील आहेत. पंजाबमधील जालंधरच्या फिल्लौरमधून अशी एक भयंकर घटना समोर आली आहे. जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या पत्नीने चक्क तिच्या झोपलेल्या पतीचा पेटवले. सरकारी नोकरी करणाऱ्या एका तरूणाची सोशल मीडियावर एका तरूणीशी मैत्री झाली. ही मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचे रूपांतर रूपांतर प्रेमात झाले. यांनंतर दोघांच्या कुटूंबाच्या संमतीने त्यांनी प्रेम विवाह केला.

सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या एका तरूणाची सोशल मीडियावर एका तरूणीशी मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांनी प्रेम विवाह केला. मात्र लग्न झाल्यानंतर तरूणाला त्याची पत्नी व्यसनी असल्याचे लक्षात आले. आपली पत्नी मद्यपान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. हे त्याच्या निदर्शनास आले. दरम्यान, संसार सुरू असताना या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की एके दिवशी पत्नीने तिच्या झोपलेल्या नवऱ्यावर स्पिरीट टाकले आणि त्याला पेटवून दिले. या घटनेत पती 40 टक्क्यांपर्यंत जळाला. यानंतर पीडित पती आठ महिन्यांपासून न्यायासाठी लढा देत आहे. मात्र अद्याप त्याला न्याय मिळालेला नाही, अशी माहिती मिळतेय.

गुरप्रीतसिंग असे या पीडित पतीचे नाव असून त्याने असे सांगितले की, तो रेल्वेमध्ये नोकरी करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या पत्नीच्या संपर्कात आला, त्यानंतर दोघंही कुटूंबाच्या संमतीने विवाहबद्ध झाले. दरम्यान, लग्नानंतर त्याची पत्नी दुकानातून दारूची एक पेटी घेऊन तिने तिच्या खोलीत ठेवली.यासह तो असंही म्हणाला, दोघांमध्ये बरेच वाद व्हायचे. यानंतर दरम्यान, पत्नीने त्याच्यावर स्पिरीट ओतले आणि त्याला पेटवून दिले. या घटनेत तो 40 टक्क्यांपर्यंत जळाला.