हिंगणघाट मध्ये व्यापा-याच्या घरी बंदुक आणि चाकूचा धाकावर हमला, एक महिला जखमी.

✒️मुकेश चौधरी, उपसंपादक✒️
📲7507130263
हिंगणघाट:- शहरातील एका व्यापा-याचा घरी काही गुंडानी हमला केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामूळे एकच खळखळ माजली आहे. व्यवसायिक बाबूलाल कोचर यांच्या घरात तिन गुंड घुसुन त्याच्या घरी असलेल्या महिलेवर चाकूने वार करुन जखमी केल.
तिन गुंड सकाळ पासुन व्यवसायिक बाबूलाल कोचर हे राहत असलेल्या परिसरात घुमत होते. दुपारच्या सुमारास सामसुम बघुन ते गुंड घराचा दार उघडून घरात घुसले त्यावेळी घरातील महीला आणी मुलगी टीव्ही बघत होते. अचानक त्यागुंड्यानी त्या महीलेचा गळा दाबून शस्त्र व बंदुक दाखवत महिलाना धमकी देत ओरडली कि तुला जीवानिशी ठार मारेल असे बोलला. काही वेळातच एका गुंड्याने चाकू काढून महिलेचा हातावर वार केल. घाव मारल्याने महिला जिवन आकांतानी ओरडायला लागली त्यामूळे ते तिघे तिथून पसार झाले.
हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढत आहे. दारु, गांजाचा तर महापुरच आला आहे त्यामूळे आज शहरात गुंडा गर्दी वाढ झाल्याचे दिसून येथे त्यामूळे स्थनिक पोलिस विभागावर मोथे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.