नागभीड येथे भव्य मोफत रोगनिदान तसेच औषधोपचार शिबीर”

54

नागभीड येथे भव्य मोफत रोगनिदान तसेच औषधोपचार शिबीर”

नागभीड येथे भव्य मोफत रोगनिदान तसेच औषधोपचार शिबीर"

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभिड : – हिंदु हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, शिवसेना नागभीड आणि आस्था हॉस्पिटल ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने, भव्य मोफत रोगनिदान आणि औषधोपचार शिबिर, रविवार दिनांक 23 जानेवारीला, , नागभीड येथे सकाळी 11:30 ते सायंकाळी 5:00 या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक बेशिक शाळा बाजार चौक येथेआयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिरात डॉ. सुशील चुर्हे अस्थिरोग, वातविकार तज्ञ, डॉ. सुमित जयस्वाल जनरल फिजिशियन, हृदयरोग, मधुमेह तज्ञ, डॉ. पंकज लडके जनरल फिजिशियन,हृदयरोग, मधुमेह तज्ञ, हे सेवा देणार आहेत.
तरी जास्तीत जास्त जनतेनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन, शिवसेना तालुका प्रमुख भोजराज ज्ञानबोंनवार ,शहर प्रमुख श्रिकांत पिसे ,मनोज लडके शिवसेना उप-तालुका प्रमुख इतर शिवसैनिकांनी कळविले आहे.