सुट्टीच्या दिवशी कर्जतमध्ये बेकायदेशीर कामांना उत
शहरातील नवीन प्रशासकीय भवनासमोरील मुख्य रस्त्यावर कन्याशाळेसमोर अनधिकृत पक्की टपरी
✒️रुपेश महागावकर
कर्जत खालापूर प्रतिनिधी
📞 93731 57184
कर्जत: कर्जत नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नवीन प्रशासकीय भवनसमोरील मुख्य रस्त्यावर कन्या शाळेच्या समोर राजरोसपणे अतिक्रमणाचा विळखा पडत आहे. शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे दुकानाच्या गाड्या व टपर्या सदर ठिकाणी लागत आहेत. काल दि. २० जानेवारी रोजी प्रशासकीय भवनाकडे जाणार्या वळणावरच एका काकांनी लिंबु सरबताची गाडी लावली होती. त्यांना योग्य प्रकारे समज दिल्याबरोबर त्यांनी पाचच मिनिटात गाडी हठवुन सहकार्य केले. पण, आज रविवार सुट्टीचा दिवसाचे औचित्य साधुन सरगळकर नामक व्यक्तीने पक्की लोखंडी भलीमोठी टपरी आणुन बरोबर कन्याशाळेसमोरच ठेवली आहे. ह्याबाबत टपरी घेऊन येणार्या कामगारांना विचारले असता ते बोलले की, त्यांनी कर्जत नगरपरिषदेची व तहसीलदारांची परवानगी घेऊन इथे टपरी लावली आहे. परवानग्या ज्या ज्या अधिकारी वर्गाकडुन मिळाल्यात असे समजल्यावर खात्री करण्यासाठी आम्ही कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. वैभव गारवे साहेब, अतिक्रमण विभागाचे अधिकारी बाळा निकाळजे साहेब, तहसीलदार शितल रसाळ साहेब* यांना फोन करून विचारले असता ह्या सर्व अधिकारी महोदयांनी सांगितले की, आम्ही अशाप्रकारे बेकायदेशीर टपरी लावण्यास कुणालाही परवानगी दिली नाही. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बेकायदेशीरपणे अशाप्रकारे येथे सदर टपरी आणुन ठेवली असेल, आम्ही ह्यावर नक्कीच कारवाई करु असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले. सदर प्रसंगी नगरपरिषदेचे म्हसे आण्णा देखील उपस्थित होते. त्यांनीही सदर बेकायदेशीर टपरी हटविण्याचे सांगितले आहे.
शहरातील नागरिकांची अशाप्रकारे स्वच्छ सुंदर असलेला परिसर विदृप करण्याची मानसिकताच कशी काय होते? प्रशासनाचा अशा गोष्टींवर अंकुश नसल्याचेच विदारक चित्र समोर येत आहे. प्रशासन अशा बेकायदेशीर, अतिक्रमणांना आळा घालण्यास प्रयत्न करेल का? असा सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे.