रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक भूमीचा वारसा जतन आणि
संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य –महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :- रायगड जिल्ह्यालां ऐतहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या ऐतिहासिक भूमीचा वारसा जतन आणि संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे दिली.प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत दर्या सारंग कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभिकरण कामाचे भूमिपुजन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, मुख्याधिकारी अंगाई सांळुखे आदि उपस्थित होते.
यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, आपण सर्व भाग्यशाली आहोत की आपण या भूमीत जन्माला आलो आहे. त्यामुळे या ऐतहासिक भूमीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे. पर्यटन विभागाची राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याची पालकमंत्री असताना दर्या सारंग कान्होजी आंग्रे समाधी परिसर भूमीचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या सुशोभीकरणसाठी लागणारा निधी हा एका टप्प्यात मंजूर करण्यात यावा. मात्र त्यावेळी आर्थिक बाब लक्षात घेता दोन टप्प्यात हे काम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार वैशिष्ट्य पूर्ण निधीतून निधी मंजूर करून घेण्यात आला. पहिल्या टप्प्याचे काम सुरू असतानाच दुसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी सन-2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये निधी मंजूर करून दिला जाईल. दर्या सारंग सरखेल कान्होजी राजे आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांचे कादकिर्दीत त्यांनी केलेले पराक्रम व इतिहास हा तरुण पिढीला व सर्वसामान्य जनतेला अनुभवता यावा व कळावा याकरीता अलिबाग शहरातील कान्होजी राजे समाधी स्थळाचे सौदर्याकरण करुन विकसित करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलिबाग नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी केले.