अपघातात पाच जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. ट्रकने पती-पत्नीसह चौघांना चिरडले, तर पिकअप वाहनाने एका विद्यार्थिनीचा जीव घेतला.
त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
नागपूर.शरहात एका मागे एक तीन भीषण अपघातात पाच जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. ट्रकने पती-पत्नीसह चौघांना चिरडले, तर पिकअप वाहनाने एका विद्यार्थिनीचा जीव घेतला.पहिली घटना कपिलनगर ठाण्यांतर्गत घडली. काकूवरील अंत्यसंस्कार आटोपून दुचाकीने घरी जात असलेल्या दाम्पत्याला भरधाव ट्रकच्या चालकाने जबर धडक दिली. यात गंभीर जखमी पती-पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
देवानंद विठ्ठल उके (43) आणि सोनी देवानंद उके (वय 39 रा. यशोधरानगर), अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. पोलिसांनी देवानंद यांचे काका सुदेश अशोक पानतावणे (वय 40 रा. समतानगर) च्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकावर गुन्हा नोंदविला आहे. सुदेश यांच्या पत्नीचा अर्धांगवायूमुळे मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवानंद व त्यांची पत्नी सोनी अंत्यसंस्कारासाठी गेले होते. परतताना त्यांच्या वाहनात बिघाड आला. त्यामुळे देवानंद यांनी घरी जाण्यासाठी काका सुदेश यांची मोटारसायकल घेतली. रात्री साडेनऊच्या सुमारास कपिलनगरातून कामगारनगर चौकात पोहोचले.
सिग्नलजवळ ट्रक क्र. एमएच-40/सीएम-5100 च्या चालकाने त्यांच्या वाहनाला मागून जबर धडक दिली आणि फरार झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, देवानंद यांच्या मोटारसायकलचा चाक निघून वेगळा झाला. दोघेही पती-पत्नी उसळून जमिनीवर पडले. त्यांच्या डोक्यांना जबर मार लागला. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. दोघांनाही उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, काही वेळातच दोघांचाही मृत्यू झाला. कपिलनगर पोलिसांनी आरोपी ट्रक चालकावर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला.