वडील आईला शिव्या देत असल्यामुळे मुलगा अस्वस्थ झाला, यातच त्याचा राग अनावर झाला आणि अल्पवयीन मुलाने वडिलांची गळा दाबून हत्या केली आहे.

44

वडील आईला शिव्या देत असल्यामुळे मुलगा अस्वस्थ झाला, यातच त्याचा राग अनावर झाला आणि अल्पवयीन मुलाने वडिलांची गळा दाबून हत्या केली आहे.

वडील आईला शिव्या देत असल्यामुळे मुलगा अस्वस्थ झाला, यातच त्याचा राग अनावर झाला आणि अल्पवयीन मुलाने वडिलांची गळा दाबून हत्या केली आहे.

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो. 9096817953

नागपूर :- दारू पिऊन वडील आईला नेहमी शिवीगाळ आणि मारहाण करायचे, त्यामुळे संतापलेल्या अल्पवयीन मुलाने वडिलांची गळा दाबून हत्या केली आहे. मुकेश शेंडे असं मृत्यू झालेल्या 57 वर्षांच्या मृत व्यक्तीचे नाव आहे.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना अल्पवयीन मारेकऱ्याच्या मित्राने समजवून सांगितल्याने प्रकरण पोलिसांमध्ये पोहोचलं. हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत इंगोले नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

मुकेश शेंडे याचा मृतदेह त्याचा अल्पवयीन मुलगा पोत्यात बांधून नदीत फेकण्यासाठी नेत होता, त्यावेळी अल्पवयीन मारेकऱ्याच्या मित्राने पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी मुकेशची पत्नी उर्मिलाला पोलिसांनी अटक केली आहे, तसंच 10वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुकेश हा हार्डवेअरच्या दुकानात काम करायचा, त्याला दारूचं व्यसन होतं. दारूच्या नशेत मुकेश पत्नी आणि मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी रात्रीही मुकेश दारू पिऊन घरी आला होता. यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करायला सुरूवात केली. मुकेशचं हे रोजचंच नाटक असल्यामुळे पत्नीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

घरी आल्यानंतर मुकेशने थोडावेळाने पत्नीकडे जेवण मागितलं, तेव्हा त्याची पत्नी उर्मिला जेवण बनवण्यात व्यग्र होती. स्वयंपाक बनवायला उशीर झाल्याने मुकेशने पुन्हा शिवीगाळ करायला सुरूवात केली, तेवढ्या मुलगा घरी आला. वडील आईला शिव्या देत असल्यामुळे मुलगा अस्वस्थ झाला, यातच त्याचा राग अनावर झाला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला.
मुलाने वडिलांना बेडवरून खाली ओढलं, यावेळी दोघांमध्ये हातापायी झाली, यामध्ये मुलाच्या नाकाला जखम झाली, त्यामुळे रागाच्या भरात मुलाने टॉवेलने वडिलांचा गळा आवळून हत्या केली. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी पत्नी उर्मिलाला अटक केली आहे, तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.