ना.अदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद दिल्यास आमरण उपोषनास बसणार- सारिका शिंदे यांचा इशारा

203

ना.अदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद दिल्यास आमरण उपोषनास बसणार- सारिका शिंदे यांचा इशारा

ना.अदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद दिल्यास आमरण उपोषनास बसणार- सारिका शिंदे यांचा इशारा
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग: – रायगड जिल्हाच्या पालकमंत्री पदाचा तीडा सुटत नसतानाच आदिती तटकरे यांचे पालकमंत्री म्हणून नाव जाहीर करण्यात आले होते. या नावाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यामुळे संबंधित नावाला स्थगिती देण्यात आली आहे. तरी रायगडच्या पालकमंत्री पदी नामदार भरत शेठ गोगावले यांची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा त्यांच्या ऐवजी आदिती तटकरे यांची पालकमंत्री पदी निवड झाल्यास मी पक्षाची सामान्य कार्यकर्ते म्हणून आमरण उपोषणास बसणार असा इशारा सारिका ताई शिंदे यांनी दिला आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली या निवडीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. व आंदोलन केले,व आपले राजीनामे ही सादर केले होते.याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नावाला स्थगिती दिली आहे.
रायगडचा पालकमंत्री पदासाठी सलग चार वेळा निवडून आलेले आमदार भरत शेठ गोगावले हेच व्हावे अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ रायगड मधील तीन आमदारांमध्ये भरत शेठ गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या पाठी ठाम राहून पक्ष वाढीसाठी काम केलं होते. मागील वेळी भरत शेठ गोगावले यांना मंत्रीपदासाठी वाट पाहावी लागली तरीही एकनाथ शिंदेंच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या मंत्रीपदावर त्याग केला. यावेळी चौथे वेळ निवडून येऊन भरत शेठ गोगावले यांनी विक्रम केला असून त्यांना मंत्रिपद ही मिळालेआहे. म्हणून रायगड मधील भाजप व शिवसेनेच्या सहा आमदारांनी भरत शेठ हेच पालकमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तरीही या सर्वांना दूर करून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या रायगडचे पालकमंत्री झाल्या म्हणून शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलं होतं त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे पक्षप्रमुख यांच्या कडे पाठवले होते. याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी स्थगिती दिली आहे.तरी आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की रायगडच्या पालकमंत्री पदी नामदार भरत शेठ गोगावले यांची नियुक्ती करावी. जर भरत शेठ गोगावले यांना डावलून अदिती तटकरे यांना पालकमंत्री घोषित केल्यास मी आमरण उपोषण करणार असा इशारा शिवसेना कार्यकर्ती सारिका शिंदे यांनी दिला आहे.