रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त मौजा राजापूर ( नाकाडोंगरी ) येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे जनजागृती
✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
तुमसर :- दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोज शनिवारला मौजा राजापूर ( नाकाडोंगरी ) तुमसर येथे शिवाजी महाराज जयंती सोहळा निमित्त अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा भंडारा व तालुका तुमसर च्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर जनजागृती प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डी.एस. भैसारे व उद्घाटक श्री. प्रदिप पाटील ( पोलिस निरीक्षक गोबरवाही ) हे होते. अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर प्रबोधन श्री. मूलचंद कुकडे ( अ.भा.अं.नि.स.भं.सचिव ) श्री.ज्ञानचंद जांभुळकर ( अ. भा. अं. नि. स. भं.जिल्हा उपाध्यक्ष ) श्रीमती प्रियाताई शहारे भंडारा, तसेच श्री. राहुल डोंगरे तालुका संघटक तुमसर यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग दाखवून प्रबोधन केले. या जगात भुत,तंत्रमंत्र,जादूटोणा,भानामती,चेटकीण,करणी असे काहीच नसते असे सांगितले,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणत्याही देवाधर्माला विरोध करीत नाहीत, जे लोक देवधर्माच्या नावाखाली लोकांची लुबाडणूक करतात अश्याच लोकांविरुद्ध प्रबोधन कार्यक्रम घेत असते असे सांगितले, जादूटोणा व करणी नावावर गावागावात झगडे व ज्या मारामारी, खून असे मोठे अपराध असते ते थांबविण्यासाठी आम्ही लोकांना जागृत करण्याचे कार्य करीत असतो, आणि असे मोठे अपराध थांबविले पाहिजे,जादूटोणा वा करणी प्रकार नाहीत, अशी जनजागृती प्रबोधन करुन राजापूर ग्रामवसियाना मोलाचे मार्गदर्शन देवून लोकांचे आभार मानून कार्यक्रम संपविण्यात आले.