सत्य काय ? समजण्याची गरज

55

 

लेख : –

सत्य काय ? समजण्याची गरज

सत्य काय ? समजण्याची गरज

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५📱
📞 ८७९९८४०८३८📞

मोहाडी :- एक विदारक झोंबणार सत्य, भारतात एकूण ६३०० च्या वर जाती आहेत.
खालील माहितीमध्ये समाविष्ट जाती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत.
१) SC ( अनुसूचित जाती ) एकूण जाती – ५९ आरक्षण – १३%
२) ST ( अनुसूचित जमाती )
एकूण जाती – ४७ आरक्षण – ७%
३) OBC ( इतर मागासवर्ग )
एकूण जाती – ३४६ आरक्षण – १९%
४) SBC ( विशेष मागासवर्ग )
एकूण जाती – ७ आरक्षण – २%
५) VJ ( भटक्या जमाती ‘ अ ‘ )
एकूण जाती – १४ आरक्षण – ३%
६) NT – B ( भटक्या जमाती ‘ब ‘ ) एकूण जाती – ३५ आरक्षण – २.५%
७) NT – C ( भटक्या जमाती – ‘ क’ ) एकूण जाती – ०१ ( धनगर )
आरक्षण – ३.५%
८) NT – D ( भटक्या जमाती – ‘ ड ‘) ( वंजारी ) आरक्षण – ५२% व ते घेणाऱ्या एकूण जाती – ५१०
त्यातील अनुसूचित जातीसाठी – १३% आरक्षण. व ते घेणाऱ्या एकूण जाती – ५९.

तर बौद्ध समाजाचा (आंबेडकरी )
आरक्षणाचा टक्का काढला तर तो फक्त ( ०.३%) पूर्णांकात नव्हे तर पॉईंटमध्ये येतो …….
” म्हणजे एक टक्काही नव्हे.” तसेच Atrocity कायद्याचे संरक्षण आहे. अशा अनुसूचित जाती – *(५९) अनुसूचित जमाती (४७) म्हणजे एकूण – १०८ जाती येतात. सुधारणांच काय ?
हा कायदा रद्द जरी झाला, तरी त्यांचे दुष्परिणाम या सर्व १०८ जातींना भोगावे लागतील.
एकट्या बौद्धसमाजाला नव्हे.
असे सर्व वास्तव असतानाही सगळ्यांच्या डोळ्यात येतो तो फक्त बौद्धसमाज. व यांनीच सर्वांच्या नोकऱ्या पळविल्या असा गुडघ्यात मेंदू तर्क लावला जातो.वरील सर्व ५१० जाती या डॉ. बाबासाहेबांच्या उपकारावरच जगतात. त्यांचा स्वतःच्या व त्यांच्या नेत्यांच्या पून्याईवर नव्हे.
पण यातील ९९% जातींना या महामानवाचे नाव घ्यायलाही लाज वाटते.यांनी त्यांना मिळणाऱ्या फायद्याचा मानकरी कोण ? हे स्वातंत्र्यपूर्व काळातील आपली स्थिती आठवून जरा स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारावा. मग सत्य काय ते तुम्हालाच कळेल.