महाराजांची भवानी तलवार अन् वाघनखं भारतात आणणार, शिवजयंतीच्या पर्वावर महाराष्ट्र गीताचे चंद्रपुरात शुभारंभ

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

चंद्रपूर,19 फेब्रुवारी: महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शिवजयंतीच्या पर्वावर महाराष्ट्र गीताचे शुभारंभ रविवार, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी चंद्रपुरात पार पडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार आणि ज्याने अफजल खानाचा कोथळा काढला ते वाघनखं इंग्लंडच्या संग्रहालयातून भारतात परत आणण्यासाठी मी पत्रव्यवहार करीत आहे. लवकरच त्याला यश येईल आणि जगदंब तलवार आणि वाघनखं भारतात आणू, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

सायं. ६.०० वाजता ते आग्रा येथील दिवान–ए-आम, आगरा फोर्ट येथे आयोजित शिवजन्मोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here