नंदकिशोर वाढई यांची अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी निवड.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा (ता. प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई हे उत्तम कार्य करीत आहे. त्यांच्या कार्य कर्तुत्वव व अनुभवाची दखल घेऊन आखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
सरपंच नंदकिशोर वाढई हे अनेक अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात, त्यांनी कळमना येथे अनेक विकासकामे केली आहे. त्याच बरोबर ते समाज कार्यासाठी नेहमीच पुढे राहिले आहे. त्यांना पणजोबा पासून समाजसेवेचा वारसा लाभला आहे त्याचे पणजोबा समाजसेवक नागोबा पाटील वाढई यांनी १०० वर्षा अगोदर गोरगरीबांसाठी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन फार मोठी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी बहुरुपी, कैकाडी, धनजोगी अशा अनेक भटक्या समाजासाठी काम केले. त्यांच्या समाजसेवेची जाणीव म्हणून त्यांचे पणतु सरपंच नंदकिशोर वाढई यांनी समाजसेवक नागोबा पाटील वाढई यांच स्मारक कळमना येथे बांधले, त्याच बरोबर कळमना ग्रामपंचायत ची सुरुवात ही राष्ट्रगीताने होते. अशी ही पहिलीच ग्रामपंचायत असेल की ती देशाबद्दल असलेलं राष्ट्रप्रेम हे 26 जानेवारी व 15 आगस्ट पुरतेच मर्यादित न राहता दररोज राष्ट्रगीताने सुरुवात करुन राष्ट्रप्रेम निर्माण करते अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सरपंच नंदकिशोर वाढई हे राबवीत असतात, त्यांनी सरपंच झाल्या पासून गावातील समाजसेवा करणार्या व्यक्ती कडून, कधी उत्कृष्ट विद्यार्थ्यां कडुन कधी जेष्ठ नागरिकांन कडुन कधी गावात स्वच्छता करणार्या मजुरा कडुन तर कधी गावात समाज सेवा करणाऱ्या महिला भगिनी कडुन त्या नी स्वतःचा ध्वजारोहणाचा मान देऊन त्या त्या समाज सेवा करणाऱ्या मंडळींना संधी देऊन ध्वजारोहण केले आहे एवढेच नव्हे तर मनुष्याचा शेवटचा विसावा घेतल्या नंतर त्यांचे अंतिम संस्कार सुद्धा शासकीय इतमामात साडी चोळी व पुष्प चक्र देऊन कळमना ग्रामपंचायत च्या वतीने सलामी देऊन मानवंदना दिली जाते आहे. अशा त्यांच्या कार्यशैली मुळे नंदकिशोर वाढई यांचा परिचय समाजातील विविध घटकांना आहे. त्यामुळेच अशा कर्तुत्ववान व्यक्तीमत्वाची, जनमानसात पाळेमुळे खोलवर रुजलेलया माणसाची, दिन दलित शोषीत पिडीत वर्गासाठी काम करणार्या कार्यकर्ता ची निवड अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी कळमना येथील उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांची अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्यांची निवड ही संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य जयंत पाटील साहेब यांच्या सुचनेनुसार राजेंद्र कराळे सर राज्य सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली, अँड. देवाभाऊ पाचभाई, विदर्भ अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 20-02-2024 रोज मंगळवार ला अखिल भारतीय सरपंच परिषदेची जिल्हा बैठक शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे पार पडली. या बैठकीमधये सर्व सरपंच यांच्या सहमतीने राजुरा तालुक्यातील कळमना येथील उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीला सहायक गट विकास अधिकारी संदीप वायाळ साहेब, विदर्भ अध्यक्ष अँड देवा भाऊ पाचभाई, सतीश नदगीरवार , रत्नाकर चटप, अरुण रागीट, बापुराव जी मडावी, अरुण काळे, अनिल सोनुले, विजेंद्र घरत, संकेत सोनवणे, अतुल धोटे, सचिन बोंडे,गणपत चौधरी, अनिता पिदुरकर , सध्या पाटील, इंदिरा बाई पोडे, स्नेहा साव, ऋतिका नरुले, तुणाली धदरे, रंजना पेदोर, सुनिता कातकर,किरण चालखुरे व इतर सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. त्यांच्या या निवडीमुळे अखिल भारतीय सरपंच परिषदेला निश्चितच बळ मिळणार आहे आणि हि सरपंच परिषद चंद्रपूर जिल्हा मध्ये उत्तम काम करुन ग्रामीण भागातील जनतेचा कणा असलेल्या सरपंचांना बळ देऊन ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळवून दिल्या शिवाय राहणार नाही अशी भावना समाज माध्यमात उमटत आहेत.
याप्रसंगी स्मार्ट उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांनी निवड झाल्यानंतर बोलताना सांगितले की माझ्या वर अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करुन प्रचंड मोठी विश्वासाने जबाबदारी दिली आहे त्यामुळे मी सर्व त्याचं मनःपूर्वक आभार मानतो कारण माझी पार्श्वभूमी ही नेहमीच समाजसेवेची राहिली आहे मला समाज सेवा करण्यासाठी माझ्या पणजोबा कडून हि प्रेरणा मला मिळाली आहे म्हणून मी निश्चित च दिन दलित शोषीत पिडीत सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे व त्या च बरोबर अखिल भारतीय सरपंच परिषदेचे काम चोख पणे बजाऊन सरपंचांना पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, वेळ प्रसंगी राज्य स्तरावर संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील साहेब, राजेंद्र जी कराळे सर राज्य सल्लागार, अँड देवा भाऊ पाचभाई विदर्भ अध्यक्ष यांच्या मदतीने मदत करुन जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांचें काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे सर्व सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सर्व पदाधिकारी यांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभार व्यक्त करतो आहे