जर तुम्ही प्राणी पाळत असाल तर तुम्हाला हे कायदे माहितीच हवे; अन्यथा…
उल्हास पुराडकर, पनवेल तालुका प्रतिनिधी
७०२८०९८६४२
माथेरान :- रायगड, दिनांक २१ फेब्रुवारी: माथेरान हया पर्यटन स्थळी घोड्यांचा सरास वापर केला जातो. येथील घोड्यांना आम्ली इंजेक्शन देवुन त्यांच्याकडुन जबरदस्तीने काम करून घेणार्या घोडे मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना-माथेरान कडून माथेरान पोलीस ठाणे व स्थानिक आश्वपाळ संघटनेला निवेदन देण्यात आले आहे. लवकरच मनसे शिष्टमंडळ कडून पोलिस निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी व स्थानिक अश्वसंघटना यांची बैठक घेऊन अशा मालकांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि भविष्यात पुन्हा असे घडणार नाही, त्यासाठी योग्य ती तरतुद करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच असे कृत्य करणाऱ्या इतर संबंधित घोडे मालक यांची महिती द्यावी, असे आवाहन मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेन्द्र पाटील साहेब, माथेरान शहर अध्यक्ष भूषण सातपुते साहेब आणि इतर मनसे पदाधिकारी यांनी स्थानिक नागरिकांना केली; माहिती देणार्यांचे नाव गुप्त राखून घोडे मालकांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
भारतीय दंड संहिता (IPC) 1860 ही भारताची अधिकृत फौजदारी संहिता आहे जी फौजदारी कायद्याच्या सर्व मूलभूत पैलूंचा समावेश करते. IPC च्या कलम 428 आणि 429 मध्ये प्राण्यांना मारणे, विष देणे, अपंग करणे किंवा निरुपयोगी बनवणे, प्राण्यांच्या मारामारी चे आयोजन करणे किंवा योग्य अधिकाराशिवाय प्रयोगासाठी प्राण्यांचा वापर करणे यासारख्या कृतींचा समावेश आहे ; यासारख्या सर्व क्रूर कृत्यांसाठी शिक्षेची हि तरतूद आहे.