बैलगाडा शर्यतीतला गोल्डनमॅन पढरीशेठ फडके यांचे निधन. निधनानंतरही पढरीशेठ फडके यांचा सोशल मीडियावर मोठा दबधबा…..
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-महाराष्ट्रराज्य बैलगाडा संघटनेचे मा. अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचा आज निधन झाले. निधनानंतरही पंढरीशेठ फडके यांचा सोशल मीडियावर मोठा दबधबा असलेला पहावयास मिळत आहे. वोल्वो मर्शीडीस गाडीवाला हे त्याच्यावरील गाणे खूप फेमस झाले होते.पनवेल तालुक्यातील विहीरघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्याचे नाव घेतले की अंगावर किलोभर सोने गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेज हे सगळे चित्र डोळ्यासमोर यायच त्याच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पनवेल तालुक्यातील विहीरघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते.1996 पासून वडिलांमुळे शर्यतीमुले पंढरीनाथ फडकेना बैलगाडीचा नांद लागला. तिथंपासून सुरु झालेली आवड फडकेणी जपली होती आतापर्यंत 40 ते 50 शर्यतीची बैल त्याची राखण ठेवली होती. कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरमध्ये आलेला बैल त्याच्या ह्रदयात कोरायचा मग तो कितीही रुपयाचा असो तो घ्यायचं त्याच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल यांनी 11 लाख रुपयाची शर्यत जिंकली होती.आज दि.21 फेब्रुवारी रोजी त्याचे निधन झाले पंढरीशेठ फडके गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे तसेच सर्व राजकीय पक्षाची त्याचे जवळचे सबंध होते त्यामुळे अनेकांचा पोशिंदा गेल्याचे दुःख पनवेल तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होत आहे.